वृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार
-जिल्हाधिकारी
एस. रामामुर्ती
बुलडाणा, दि. 19 :
भारत वृक्ष क्रांती मोहिमेतून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम
प्रशंसनीय आहे. या उपक्रमामुळे किशोर वयात वृक्ष लागवडीबाबत विद्यार्थ्यांच्या
मनावर संस्कार घडणार असल्याने या मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार
असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
एक विद्यार्थी एक
वृक्ष लागवड उपक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम भादोला येथील जिल्हा
परिषदेच्या शाळेत पार पडला. यावेळी सरपंच प्रमोद वाघमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी
प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, विभागीय वनाधिकारी बी. एन.
पायघन, गटशिक्षणाधिकारी संजय पवार, विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, मुख्याध्यापक
गजानन कंकाळ, समन्वयक ए. एस. नाथन, पोलिस पाटील सुर्यकांत गवई आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
म्हणाले, विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही अतिशय चांगली बाब आहे.
वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धन होणा आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्तव्य
आणि जबाबदारीची जाणीव होईल. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी पुढे येण्याची
गरज आहे. शिक्षणातील सहभागामुळे गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे
त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राथमिक
शिक्षणाधिकारी किशोर पागोरे आणि समन्वयक ए. एस. नाथन यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात राजभवन येथे कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेले शाजीया हरून, सोमनाथ ठेंग यांचा सत्कार
करण्यात आला.
00000
एकात्मिक
आदिवासी प्रकल्पाच्या शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि. 19 : प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत येत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील
पाच आदिवासी मुलांचे आणि मुलींच्या शासकीय वसतीगृहामधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दहावी आणि बारावी उत्तीर्ण आदिवासी
विद्यार्थ्यांकरीता पुढील लगतच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
Swayam.mahaonline.gov.in या वेबसाईटवा ऑनलाईन फॉर्म भराव. तसेच सदर फॉर्म आणि सोबतचे आवश्यक दस्ताऐवज संबधित
वसतीगृहामध्ये असलेल्या रिक्त जागेकरीता दि, 18 जुलै 2022 ते दि. 5 ऑगस्ट 2022
पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वसतीगृह
पुढीलप्रमाणे आहेत. आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, चिखली रोड, कादरीया कॉलेज
जवळ, बुलडाणा, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, जिजामाता कॉलेज जवळ, बुलडाणा, या
वसतीगृहासाठी दहावी आणि बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, बँक ऑफ
महाराष्ट्र जवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा, आदिवासी मुलांचे शासकीय
वसतीगृह बुलडाणा अर्बन बँकेच्या जवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर जि. बुलडाणा,
आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह जी. एस कॉलेजच्या मागे, खामगाव जि. बुलडाणा
वसतीगृहाकरीता सातवी, दहावी आणि बारावीच्या पुढील लगतच्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश
घेतलेल्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी,
विद्यार्थीनी हे अनुसुचित जमातीचे असावेत, विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी
जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदार यांचा मुळ उत्पन्नाचा दाखला
आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.
सदरचे खाते आधारकार्ड आणि मोबाईल संलग्न असावे. बँक खात्याची प्रत सोबत जोडावी.
विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहर, तालुक्याच्या ठिकाणी
आहे, अशा शहरातील विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. विद्यार्थ्यांने प्रवेश
घेतलेली संस्था मान्याताप्राप्त महाविद्यालय, संस्थांमध्ये आणि मान्यताप्राप्त
अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने आदिवासी
विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधकारक आहे.
अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचे वसतीगृहामध्ये
प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे
बोनॉफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र, शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला आणि
मार्कशिट, विद्यार्थ्यांचा फोटो, आधारकार्ड, ग्रामसेवक, तलाठी यांचे आई, वडील
नोकरी करीत नसल्याचे मूळ प्रमाणपत्र, ऑनलाईन भरलेला फार्म ऑफलाईन काढून सदर प्रत
आणि सोबत ऑनलाईन सादर केलेले आवश्यक सर्व दस्ताऐवज संबधित वसतीगृहातील गृहपाल
यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहिल. सदर योजनेमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक
संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था
कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
00000
संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षेचे वेळापत्रक जाहिर
बुलडाणा, दि. 19 :
राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा आणि
स्पेशन स्कील इत कॉम्पुटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स ॲण्ड स्टुडन्टस या दोन्ही
परिक्षा दि. 25 जुलै ते दि. 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने 281
परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या परिक्षेसाठीची
प्रवेशपत्रे परिक्षा परिषदेच्या mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगीनद्वारे
दि. 16 जुलै 2022 पासून उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित संगणक टंकलेखन
संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे
संकेतस्थळावरून डाऊनलोड करून शिक्का आणि स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थ्यांना
वितरीत करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना
प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने पूरविलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणणे
आवश्यक आहे. अधिसुचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे स्वत:चे नाव,
आढनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, फोटो बदल, सही बदल तसेच विषय बदल हे फक्त त्या
विषयाचेच देण्यात येतील. आदी बाबी दुरूस्ती असल्यास प्रत्येक चुकीस 200 रूपये
शुल्क आकारण्यात येणार आहे.
संस्था चालकांनी
प्रवेशपत्र निर्गमित झाल्यापासून परीक्षेपूर्वी परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन
वेळेत येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
यांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा. तरच संबंधित विद्यार्थ्यांस परीक्षेस प्रविष्ट
होतो येईल. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन
संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती
दिली जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
00000
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी
25 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 : मातंग समाजातील दहावी,
बारावी, पदवी, पदविका, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी दि. 25 जुलै 2022 पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी कमीत कमी 60 टक्के
किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची जिल्हानिहाय
निवड करण्यात येते. या लाभासाठी मातंग समाजातील 12 पोट जातीमधील विद्यार्थी असणे
आवश्यक आहे. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी,
मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा आदी पोटजातींचा समावेश
आहे.
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेच्या
लाभासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2022 आहे. अर्ज सादर करतेवेळी
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड प्रत, गुणपित्रकेची प्रत, बोनाफाईड
प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी दाखल्यांसह सादर करावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक
यांनी केले आहे.
00000
अल्पसंख्यांक संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांच्या
व्यायामशाळा, क्रीडांगण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 : क्रीडा
व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात
येणाऱ्या व्यायाम शाळा विकास आणि क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत सात लाख
रूपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात येते. यासाठी दि. 1 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक संस्थांतर्फे
चालविण्यात येणाऱ्या विविध अनुदानित शाळांना व्यायाम शाळा बांधकाम करणे, व्यायाम
शाळा साहित्य खरेदी करण्यासाठी सात लाख रूपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते.
तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध क्रीडा विषयक बाबीकरिता जास्तीत
जास्त सात लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात येते.
या दोन्ही योजनेंतर्गत
अनुदान प्राप्त करण्यासाठी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या तसेच ज्यांना
शिक्षण विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी
विहित नमुन्यातील अर्ज तात्काळ या कार्यालयातून प्राप्त करावे. त्यासोबत
करावयाच्या कामाचे अंदाजपत्रक, गत वर्षाचे लेखा विवरण, ना हरकत प्रमाणपत्र, जागेचे
नमुना आठ, सातबारा ही कागदपत्रे, जागेचे फोटो, ठराव, हमीपत्र, पदाधिकारी यादी,
घटना, नोंदणी प्रमाणपत्र, शासनातर्फे प्राप्त अल्पसंख्याकाचे प्रमाणपत्र आदी
कागदपत्रांची पुर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव दि. 1 ऑगस्ट 2022 पर्यंत दोन प्रतीत
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. अपूर्ण,
आणि त्रृटी असले प्रस्ताव स्विकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव
यांनी केले आहे.
00000
अल्पसंख्यांक संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांच्या
व्यायामशाळा, क्रीडांगण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 : क्रीडा
व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात
येणाऱ्या क्रीडांगण आणि व्यायाम शाळा विकास विकास अनुदान योजनेंतर्गत विविध
बाबींकरिता अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता सात लाख रूपयांपर्यंतचे अनुदान मंजूर
करण्यात येते. यासाठी दि. 1 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले
आहे.
फक्त अनुसूचित जाती या
प्रवर्गातील विद्यार्थी शिकत असलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा
आणि वसतीगृह तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा,
उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि वसतीगृह यांनी या योजनेसाठी अर्जाचा विहित
नमुना कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा.
व्यायाम शाळा बांधकाम
करणे, व्यायाम शाळा साहित्य खरेदी करणे तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत
क्रीडा विषयक बाबींसाठी सात लाख रूपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते. तसेच
क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध क्रीडा विषयक बाबीकरिता जास्तीत जास्त
सात लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात येते.
प्रस्तावासोबत करावयाच्या
कामाचे अंदाजपत्रक, गत वर्षाचे लेखा विवरण प्रमाणपत्र, जागेचे नमुना आठ, सातबारा
ही कागदपत्रे, जागेचे फोटो, ठराव, हमीपत्र, पदाधिकारी यादी
तसेच ज्या वस्तीत ही योजना
राबवायाची आहे, तेथील सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र, जागेच्या अवतीभोवतीच्या
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांची यादी, शासन निर्णयानुसार परिपूर्ण
प्रस्ताव दि. 1 ऑगस्ट 2022 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या
कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. अपूर्ण, आणि त्रृटी असले प्रस्ताव
स्विकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
दिव्यांगासाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक
प्रशिक्षणाचे आयोजन
बुलडाणा, दि. 19 : मिरज
येथील शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात संगणक आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी
दि. 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय,
पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण
केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगसाठी मोफत प्रशिक्षण देते. या संस्थेतील
प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची
शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल स्तरावरील फिक्की अवार्ड प्राप्त झालेला आहे.
सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत् प्रवेश देणे सुरू आहे. संस्थेत
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एमएस ऑफीस, मोटार अँड आर्मेचर रिवायडींग,
सबमर्सिबल पंप सिंगल फेज अभ्यासक्रम शिकविले जातात. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40
वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला
जाणार आहे.
संस्थेत प्रशिक्षण कालावधीत
राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक
कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व
इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, समाज कल्याण विभागाकडून
स्वयंरोजगारासाठी व्यवसायाकरीता बीज भांडवल योजना आदी सोयी सवलती आहेत.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक
अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे
मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली पिनकोड 416 410 या पत्त्यावर
पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत.
प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती
जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर
तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. गरजू दिव्यांगांनी या
सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी
0233-2222908, 9922577561, 9975375557 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन
अधिक्षक यांनी केले आहे.
*****
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रमांतर्गत रोजगाराची संधी
बुलडाणा, दि. 19 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही
योजना राबविण्यात येत आहे. उद्योग संचालनालयामार्फत त्यांनी निर्धारीत केलेल्या
बँकामार्फत लाभार्थींच्या बँक खात्यात योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जमा होणार
आहे. ही योजना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास
संलग्न अनुदान योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या लाभासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न
नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18
वर्षे पुर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्षे असून अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग. माजी सैनिक
यांना पाच वर्ष शिथील आहे.
शैक्षणिक पात्रता 10 लाख रूपयांवरील प्रकल्पासाठी सातवी पास, तसेच 25 लाख रूपयांवरील
प्रकल्पासाठी दहावी पास आहे.
या
योजनेत सेवा उद्योग व्यवसायांसाठी 10 लाख रूपये, तसेच उत्पादन प्रकारच्या
प्रवर्गातील प्रकल्पांसाठी 50 लाख रूपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. एकुण
प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पर्यंत अनुदान
उपलब्ध होणार आहे. ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. उद्योग, व्यवसाय
उभारणीसाठी शासनाच्या https://maha-cmegp.gov.in
संकेतस्थळावर भेट द्यावी. कर्ज प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी, असे असे
आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment