विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात अंदाजे
67.44 टक्के मतदान
·
मतदान सर्वत्र शांततेत
·
46 मतदान केंद्रांवर मतदान
·
23 हजार 551 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
बुलडाणा, दि.3 - विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील
निवडणूकीकरीता आज 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. मतदान
सर्वत्र शांततेत झाले. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 46 मतदान केंद्रांची
व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावरती आज सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत
पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण पदवीधर पुरूष
मतदार 26 हजार 666, स्त्री मतदार 8 हजार 253 मतदार आहेत. अशाप्रकारे एकूण मतदार जिल्ह्यात 34
हजार 919 आहेत. त्यापैकी 18 हजार 641 पुरूष मतदारांनी, तर 4 हजार 910 स्त्री
मतदारांनी मतदान केले आहे. अशाप्रकारे अंदाजे एकूण 23 हजार 551 मतदारांनी मतदानाचा
हक्क बजाविला. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती
उज्ज्वला झाडे यांनी शिवाजी विद्यालय, बुलडाणा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.
जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण केंद्र, पुरूष मतदार
व स्त्री मतदार : मलकापूर – मतदान केंद्र
3, पुरूष 1708, स्त्री 651,एकूण 2359, जळगांव जामोद – मतदान केंद्र 2, पुरूष
1414, स्त्री 515, एकूण 1929, संग्रामपूर –
मतदान केंद्र 2, पुरूष 840, स्त्री 239 व एकूण 1079, शेगांव – मतदान केंद्र 3, पुरूष 1561, स्त्री 656, एकूण 2217, नांदुरा – मतदान केंद्र 2, पुरूष 1363,
स्त्री 431, एकूण 1794, मोताळा – मतदान
केंद्र 2, पुरूष 1042, स्त्री 431, एकूण 1264, बुलडाणा – मतदान केंद्र 9, पुरूष 5543,
स्त्री 1957 व एकूण 7500, खामगांव – मतदान
केंद्र 5, पुरूष 2815, स्त्री 1214, एकूण 4029, चिखली – मतदान केंद्र 5, पुरूष 3632, स्त्री 969, एकूण 4601, मेहकर –
मतदान केंद्र 5, पुरूष 2528, स्त्री 548 व एकूण 2985, दे. राजा – मतदान केंद्र 3, पुरूष 1528, स्त्री 369, एकूण 1897, सिं. राजा – मतदान केंद्र 3, पुरूष 1389,
स्त्री 221 व एकूण 1610, लोणार –
मतदान केंद्र 2, पुरूष 1394, स्त्री 261 व एकूण 1655 मतदार आहेत.
No comments:
Post a Comment