पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन
• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे
• 7 एप्रिलपर्यंत चालणार मेळावे
बुलडाणा,(जिमाका)दि.5 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 5 ते 7 एप्रिल 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.rojgar. mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.
या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 100 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
******
8 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 30 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर
• चिखली तालुक्यातील 17, बुलडाणा 4 व दे. राजा तालुक्यातील 4 गावांमधील कामे
बुलडाणा,(जिमाका)दि. 5 : जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, बुलडाणा, दे. राजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील देऊळगांव धनगर, कोनड खु, धोत्रा नाईक, अमोना, रोहडा, गुंजाळा, अंचरवाडी, काटोडा, एकलारा, किन्ही नाईक, सावरगांव डुकरे, खैरव, भालगांव या गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरखेड, दत्तापूर, लिंगा येथे नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. तसेच लोणार तालुक्यातील धायफळ, जाफ्राबाद, पार्डा दराडे, टिटवी, दे. राजा तालुक्यातील दे. मही, गिरोली खु, बोराखेडी बावरा, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी, अंभोडा, तराडखेड, मेहकर तालुक्यातील खानापूर, घाटबोरी, दादुलगव्हाण व गणपूर गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दे. राजा तालुक्यातील सेवानगर, सिं. राजा तालुक्यातील बुट्टा, चिखली तालुक्यातील पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, गांगलगाव, मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा, बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड गावामध्ये तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.
*************
कोरोना अलर्ट : प्राप्त 2144 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 634 पॉझिटिव्ह
- 932 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2778 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2144 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 634 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 500 व रॅपीड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 555 तर रॅपिड टेस्टमधील 1589 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :95, बुलडाणा तालुका : रायपूर 1, पांगरी 1, सव 1, ढालसावंगी 1, सुदंरखेड 2, मोताळा शहर : , मोताळा तालुका : मुर्ती 1, धा. बढे 1, धोनखेडा 1, टेंभी 3, खामगांव शहर :39 , खामगांव तालुका : सुटाळा 3, कोलोरी 1, आमसरी 1, नागापूर 1, शेगांव शहर :5 , शेगांव तालुका : शिरसगांव निळे 1, चिखली शहर : 31, चिखली तालुका : खैरव 1, अमडापूर 3, उंद्री 1, बेराळा 1, शेलगांव आटोळ 1, तेल्हारा 1, शेलोडी 1, अंचरवाडी 1, शेलसूर 2, बोरगांव काकडे 3, शेलूद 1, माळशेंबा 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 13, दाताळा 1, भाडगणी 1, उमाळी 2, दे. राजा शहर : 29, दे. राजा तालुका : उंबरखेड 1, सिनगांव जहा 1, आळंद 1, कुंभारी 1, खैरव 1, डोढ्रा 1, दे. मही 5, सावखेड भोई 1, चिंचोली 1, दगडवाडी 1, जुंबडा 2, अंढेरा 1, गव्हाण 1, दिग्रस 1, बायगांव 1, धोत्रा नंदई 1,
सिं. राजा शहर :14, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, देवखेड 1, आगेफळ 1, गोरेगांव 1, निमगांव वायाळ 7, देवखेड 1, दरेगांव 1, जांभोरा 3, वाघजई 1, महारखेड 2, खैरखेड 1, सोयंदेव 1, उमरद 1, साखरखेर्डा 15, नाव्हा 1, मलकापूर पांग्रा 2, आंबेवाडी 1, भोसा 1, शिंदी 2, गुंज 6, पांगरी काटे 1, शेंदुर्जन 4, खामगांव 1, मेहकर शहर :47, मेहकर तालुका : उकळी 4, गांधारी 1, फर्दापूर 1, कळपविहीर 2, साब्रा 1, हिवरा आश्रम 8, दे. माळी 3, बोरी 2, वेणी 1, डोणगांव 5, सावरगांव 1, लव्हाळा 5, नागापूर 1,भालेगांव 1,लिंबी 3, मादनी 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : बनोसा 1, खिरोडा 1, वानखेड 1, बेलोरा 1, पातुर्डा 8, टुनकी बु 3, काटेल 1, रिंगणवाडी 2, वरवट बकाल 1,
जळगांव जामोद शहर :1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : धानोरा 1, काटी 2, वडनेर 3, डिघी 1, वडनेर 55, सावंगा 1, अवधा 1, कोळंबा 1, पोटा 2, वडाळी 3, लोणार शहर :16, लोणार तालुका : अंजनी 1, दे. कोळ 2, बिबी 4, मांडवा 5, महारचिकना 1, खळेगांव 1, मातमळ 10, पिंपरखेड 2, कऱ्हा 4, खुर्नाळा 1, गुंज 1, शिवणी 1, पाडोळी 1, चौंढी 1, सरस्वती 2, कारेगांव 1, अजिसपूर 2, भुमराळा 1, किन्ही 7, पार्डा 1, उमरी 1, किनगांव जट्टू 1,बोरी काकडे 8, धायफळ 4, खापरखेड 1, ब्राम्हणचिकना 1, पिंपळनेर 1, बिबखेड 2, पांगरा 2, तांबोळा 1, गणेशपूर 1, मांगवडी 1, हिरडव 1, भोटपूरी 2, परजिल्हा जाळीचा देव ता. भोकरदन 1, अजिंठा 1, वडोदा पानाचे ता. मुक्ताईनगर 1, अकोला 1, हिंगोली 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 634 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिं. राजा येथील 79 वर्षीय पुरूष, सावरगांव डुकरे ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील 68 वर्षीय पुरूष, चौथा ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला व मोताळा येथील 80 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 932 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 239452 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 35668 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 35668 आहे.
आज रोजी 2910 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 239452 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41704 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 35668 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5749 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 287 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
Comments
Post a Comment