Friday, 30 April 2021

DIO BULDANA NEWS 30.4.2021

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 29 एप्रिल रोजी 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. दिनांक 29 एप्रिल रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 39 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 35,रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 11, निकम हॉस्पीटल 10, जाधव पल्स हॉस्पीटल 13, सहयोग हॉस्पीटल 22, आशिर्वाद हॉस्पीटल 30, सिद्धीविनायक हॉस्पीटल 39, काटकर हॉस्पीटल 14, शिवसाई हॉस्पीटल 30, संचेती हॉस्पीटल 19, न्यु लाईफ कोविड हॉस्पीटल 1, सोळंकी हॉस्पीटल 7, सावजी हॉस्पीटल 14, चिखली : योगीराज हॉस्पीटल 45, हेडगेवार हॉस्पीटल 39, गुरूकृपा हॉस्पीटल 16, तायडे हॉस्पीटल 31, दळवी हॉस्पीटल 24, पानगोळे हॉस्पीटल 20, खंडागळे हॉस्पीटल 15, गंगाई हॉस्पीटल 15, जैस्वाल हॉस्पीटल 16, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 15, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 42, कोलते हॉस्पीटल 18, राईट केअर हॉस्पीटल 9, आशिर्वाद हॉस्पीटल 11, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 35, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 23, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 19, शामसखा हॉस्पीटल 41, खामगांव : चव्हाण हॉस्पीटल 9, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 24, श्रीराम हॉस्पीटल 5, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 23, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 26, मापारी हॉस्पीटल 26, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 15, गोविंद क्रिटीकल 13, श्री. गजानन हॉस्पीटल 35, अजंता हॉस्पीटल 6, मेहकर मल्टीस्पेशालीटी 26, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 7, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 20, मी अँड आई हॉस्पीटल 7, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 21, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 5 असे एकूण 1000 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर साठा फ्रंटलाईन वर्कर तथा डॉक्टर्स, इतर कर्मचारी वर्ग तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरीता शासनाचे सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये राखीव ठेवण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भुषण अहीरे यांनी कळविले आहे. ***** पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा, पोफळी व सि.राजा तालुक्यातील दरेगांव येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टेकडी तांडा येथील 350 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर दररोज 12 हजार 50 लिटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच पोफळी येथील 3000 लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 60 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. तर दरेगांव येथील 2328 लोकसंख्येकरीता एक टॅंकर 62 हजार 420 लीटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) मलकापूर, सिं.राजा यांनी कळविले आहे. ****** पाणी टंचाई निवारणार्थ 3 गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर 15 गावांसाठी विंधन विहीरींनाही मंजूरी बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील रताळी, निमगांव वायाळ व राहेरी खु या गावांसाठी नळ योजना विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील 15 गावांसाठी पाणी टंचाई निवारणार्थ विंधन विहीरींना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये शिरवा, काबरखेड, सहस्त्रमुळी, धोनखेड, चावर्दा, पिंपळगांवनाथ, चिंचपूर, सांगळद, डिडोळा खु, मोहेगांव, इसालवाडी, गिरोली, कोथळी, खडकी व चिंचखेडनाथ या गावांचा समावेश आहे. या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी करावा. सदर मंजूर कामे इतर निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. **** मे महिन्यात आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने माहे मे 2021 चा सोमवार 3 मे 2021 रोजी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे यांनी कळविले आहे. ****** राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतुक सेवेचे महाकॉर्गो नामकरण मालवाहतुकीसाठी संपर्क करण्याचे महामंडळाचे आवाहन बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : राज्य परिवहन महामंडळाने शासनाच्या 18 मे 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार मालवाहतूक सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश माफक दरामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी व्यवसाय, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांकरीता माल वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे व महामंडळास उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 24 तास अविरहीत सेवा, पारदर्शकता, सुरक्षितपणे, वक्तशीर व माफक्‍ दात उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाच्या मालवाहतूक सेवेचे महाकॉर्गो या नावाने नामकरण करण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे 022-23024068 या दुरध्वनी क्रमांकावर मालवाहतुकीच्या सेवेसंबंधी व्यवसाय धारकांकरीता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मालवाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारची मालवाहूतक असल्यास खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. आगार : बुलडाणा - आगार प्रमुख श्री. मोरे 8208952614, सहा वाहतुक अधिकारी श्री. साळवे 8087378154 व मालवाहतुक लिपीक श्री. भांबुरकर 7020705456, चिखली - आगार प्रमुख श्री. वाकोडे 9420242097, सहा वाहतुक अधिकारी श्री. जोगदंडे 9881564020 व मालवाहतुक लिपीक श्री. सानप 9923836193, मेहकर - आगार प्रमुख श्री. कोळपे 8329312518, सहा वाहतुक अधिकारी श्री. नागरे 9284089660 व मालवाहतुक लिपीक श्री. शिंदे 9561775834, खामगांव - आगार प्रमुख श्री. पवार 9465940627, सहा वाहतुक अधिकारी श्री. पवार 9763703744 व मालवाहतुक लिपीक श्री. वनारे 9604401091, मलकापूर - आगार प्रमुख श्री. दराडे 9923845605, सहा वाहतुक अधिकारी श्री. वांदे 9890626544 व मालवाहतुक लिपीक श्री. राठोड 8999287504, शेगांव - आगार प्रमुख श्री. भिवटे 8329773384, सहा वाहतुक अधिकारी श्री. मुसले 9922496649 व मालवाहतुक लिपीक श्री. सपकाळ 8830029350, जळगांव जामोद - आगार प्रमुख श्री. मास्कर 9881962173 व मालवाहतुक लिपीक श्री. कोठे 7448059197 तसेच विभाग नियंत्रक 07262-242593, यंत्र अभियंता श्री. धनाड 8275325642, विभागीय वाहतुक अधिकारी श्री. कच्छवे 8830279722 व विभागीय भंडार अधिकारी श्री. पाचपवार यांच्या 8055829982 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे. ***** राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. ***** कोरोना अलर्ट : प्राप्त 3841 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1218 पॉझिटिव्ह 1021 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5059 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3841 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1218 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 927 व रॅपीड टेस्टमधील 291 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 921 तर रॅपिड टेस्टमधील 2920 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3841 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 14, बुलडाणा तालुका : मासरूळ 1, डोमरूळ 2, धाड 10, सावळी 2, म्हसला 1, करडी 1, रायपूर 1, पळसखेड भट 1, केसापूर 2, वरवंड 4, बोरखेड 4, सातगाव 1, साखळी 1, बिरसिंगपूर 1, गिरडा 12, दुधा 6, कोलवड 1, सुंदरखेड 3, सिंदखेड 1, दे. घाट 2, जामठी 1, माळविहीर 1, तांदुळवाडी 1, चौथा 1, देवपूर 1, मातला 1, इजलापूर 2, शेकापूर 1, दहीद 1, मोताळा शहर : 13, मोताळा तालुका : उबाळखेड 4, राजूर 1, अंत्री 9, जयपूर 5, पुन्हई 5, मुर्ती 3, धा. बढे 14, कोऱ्हाळा 1, बोराखेडी 6, सारोळा मारोती 7, तांदुळवाडी 1, माळेगांव 1, खरबडी 3, गोसिंग 1, चिंचपूर 1, सावळा 1, तळणी 3, भोरटेक 1, काबरखेड 1, आडविहीर 4, कुऱ्हा 1, खांडवा 1, तपोवन 1, सिंदखेड 1, लपाली 1, पान्हेरा 1, ब्राम्हंदा 2, वडगांव 2, महालपिंप्री 2, गुळभेली 1, रिधोरा 1, डिडोळा 2, तालखेड 1, वरूड 1, इब्राहिमपूर 2, कोथळी 2, तरोडा 3, जहागीरपूर 1, निपाणा 3, घुसर 1, चावर्दा 1, खामगांव शहर : 67, खामगांव तालुका : पारखेड 3, कोलोरी 1, हिंगणा 1, आंबेटाकळी 1, शिर्ला 1, गारडगांव 1, सारोळा 1, पाळा 3, पिं. देशमुख 2, लांजुड 1, चिंचपूर 1, उमरा 1, बोरी अडगांव 5, शेगांव शहर : 27, शेगांव तालुका : टाकळी विरो 1, झाडेगांव 1, चिंचोली 1, जवळा 1, वाझेगांव 1, पाडसूळ 1, तरोडा 2, कोद्री 1, सगोडा 1, चिखली शहर :10 , चिखली तालुका : एकलारा 5, चंदनपूर 1, येवता 1, डोंगरशेवली 1, किन्होळा 1, कोनड 1, मंगरूळ 1, पळसखेड सपकाळ 2, हातनी 1, कोलारा 1, पेनटाकळी 1, सवणा 1, मेरा बु 1, शेलगांव आटोळ 1, पळसखेड दौलत 1, चांधई 1, मलकापूर शहर :74, मलकापूर तालुका : वाघुड 3, देवधाबा 1, दुधलगांव 1, दाताळा 5, भानगुरा 1, उमाळी 2, हरसोडा 3, खामखेड 3, वाकोडी 2, बेलाड 1, वडजी 1, शिराढोण 1, तांदुळवाडी 3, भाडगणी 4, तिघ्रा 1, माकनेर 2, कुंड 3, म्हैसवाडी 1, लोणवडी 1, धरणगाव 1, हरणखेड 1, दे. राजा शहर : 35, दे. राजा तालुका : चिंचखेड 2, दे. मही 15, निमखेड 2, डोईफोडेवाडी 1, गिरोली 3, अंढेरा 6, सिनगांव जहा 3, सरंबा 4, तुळजापूर 1, पिंपळगांव 1, किन्ही 1, सावखेड नागरे 2, नारायणखेड 5, पाडळी शिंदे 2, खळेगांव 1, डोलखेडा 1, खल्याळ गव्हाण 1, टेंभुर्णी 1, पळसखेड 1, खैरव 2, शिवणी आरमाळ 3, धोत्रा 1, मेंडगांव 1, रोहना 2, गारखेड 2, मेहुणा राजा 1, करवडा 2, नागणगांव 1, जुमडा 1, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, साखरखेर्डा 64, झोटींगा 4, आंबेवाडी 1, सायाळा 5, राहेरी 3, कि. राजा 2, मांडवा 1, दरेगांव 7, गोरेगांव 2, हिवरा गडलिंग 3, शेंदुर्जन 6, सवडत 4, गुंज 6, शिंदी 6, ताडेगांव 1, जांभोरा 2, वाघोरा 15, पिंपरखेड 1, आडगांव राजा 1, जागदरी 2, सांगवी 1, महारखेड 3, पिंपळगांव 2, मोहाडी 2, वउाळी 2, वरूडी 5, तांदुळवाडी 1, बाळसमुद्र 8, मेहकर शहर : 54, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 4, कनका 1, जनुना 1, डोणगांव 5, उमरा 1, तांदुळवाडी 1, कल्याणा 2, शहापूर 1, केनवड 1, पाळी 1, साब्रा 1, खंडाळा 1, जानेफळ 2,हिवरा साबळे 1, नांद्रा धांडे 2, गोरेगांव 3, आमखेड 3, कळमेश्वर 3,विश्वी 1, अंजनी 1, भालेगांव 1, दादुलगव्हाण 1, बरटाळा 1, वडगांव माळी 1, संग्रामपूर तालुका :लाडणापूर 1, वानखेड 1, काटेल 1, जळगांव जामोद शहर : 40, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 1, कुरणगड 2, भेंडवळ 13, सुलज 5, दादुलगाव 10, आसलगांव 2, पळशी सुपो 1, सुनगांव 5, बोराळा 5, चांगेफळ 2, इस्लामपूर 1, धानोरा 5, गोधेगांव 1, निमखेड 1,सावरगांव 1, खांडवी 1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका :डिघी 6, वडनेर 1, धानोरा 1, चांदूर बिस्वा 1, शेलगांव मुकूंद 2, टाकरखेड 4, पोटा 2, काटी 1, हिगणे गव्हाड 1, तिकोडी 5, खैरा 2, निमगांव 6, वाडी 5, महाळुंगी 2, पलसोडा 2, पिं. अढाव 1, बुर्टी 2, भुईशिंगा 1, लोणवडी 1, पोटळी 1, कोदरखेड 3, अवधा 1, तरवाडी 1, वडाळी 4, माळेगांव 1, लोणार शहर :24 , लोणार तालुका : सावरगांव 1, पळसखेड 10, वेणी 1, जांभूळ 1, पिंपळनेर 6, टिटवी 5, बिबी 3, वडाळी 1, रायगांव 6, धायफळ 8, उदनापूर 1, वडगांव तेजन 1, वढव 3, येसापूर 1, सरस्वती 5, तळणी 1, कोनाटी 2, शारा 3, पिंपळखुटा 5, शिवणीजाट 1, खळेगांव 3, चिखला 5, दे. कोळ 9, कळपविहीर 1, खंडाळा 1, कि. जट्टू 2, शिंदी 1, हिवराखंड 1, कोयाळी 5, भुमराळा 1, वझर 2, वडगांव 7, खुरमपूर 1, अंजनी 1, पार्डी 22, दादुलगव्हाण 1, बोरी 4, तांबोळा 4, दिपखेड 2, नांद्रा 1, चिंचोली 4, मोप 1, बोरखेडी 1, धानोरा 1, पार्डा 5, परजिल्हा लोहारा ता. बाळापूर 3, नागपूर 1, आलेवाडी ता. अकोट 1, राळेगांव 1, जामनेर 1, भारज 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 1218 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हिवरा आश्रम ता. मेहकर येथील 70 वर्षीय महिला, पोटळी ता. नांदुरा येथील 83 वर्षीय पुरूष, किनगांव राजा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय महिला, मधु मालती नगर मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 1021 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 355959 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 56601 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 56601 आहे. आज रोजी 4961 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 355959 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 63889 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 56601 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6878 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 410 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व समुपदेशन सत्र कार्यशाळा उत्साहात बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा व जिल्हा परिषद, बुलडाणा आणि श्री बालाजी संस्थान दे.राजा व्दारा संचालित श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देऊळगाव राजा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २७ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यात नामवंत कंपन्यांचे विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया मध्ये सहभाग नोंदविला असून दहावी, बारावी, पदवीधर, पदविकाधारक तसेच आय.टी.आय.पास उमेदवार व सेवायोजन कार्यालयातील प्राप्त केलेल्या यूजर आयडी पासवर्डचा वापर करून उमेदवारांना ऑनलाईन अप्लाय करुन या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला व सोबतच कोविड - १९ विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात उमेदवारांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचे Shri Vyankatesh College Deulgaon Raja या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दि. २७ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले. सहायक आयुक्त सुधाकर झळके सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये ऑनलाइन रोजगार मेळावा व समुपदेशन कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती दिली. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद बुलडाणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ए. चोपडे यांनी केले. या कार्यक्रमात कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी आपल्या कंपन्याबद्दलची माहिती उमेदवारांना दिली. प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयक्युएसी कॉर्डीनेटर प्रा. डॉ. एस डी चव्हाण यांनी उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी तर प्रा. डी. एम. शिंबरे यांनी आाभार व्यक्त केले. दि. २८ एप्रिल २०२१ रोजी युनिक अकॅडमी, पुणे येथील प्रा. शरद अशोकराव पाटील यांनी एमपीएससी/ यूपीएससी तयारीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधाकर झळके सहभागी कंपन्याकडे असलेल्या रिक्त जागेवर आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करून घ्यावे असे आवाहन उमेदवारांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. बी. पवार यांनी केले. या कार्यशाळेत करिता 667 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दि. २९ एप्रिल २०२१ रोजी आयुष्यातील बदल आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आशुतोष साळी, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, ठाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी.व्ही.गोरे होते. दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एस आर काळबांडे, उपायुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती व तसेच जिल्हा परिषद बुलडाणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश लोखंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर चव्हाण होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी व्यक्त केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय सुधाकर झळके यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार अजय चव्हाण, सहाय्यक, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपण सदर यूट्यूब चॅनलवर करण्यात आले. श्री बालाजी महाराज संस्थान दे.राजाचे वंश पारंपरिक विश्वस्त तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेकरिता श्री सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा, राजेश लोखंडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा प्रा. डॉ. सुधीर चव्हाण, आयक्यूएसी कॉर्डीनेटर आणि प्रा. डॉ. अनंत आवटी, समन्वयक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभाग, प्रा. सोपान चव्हाण, प्रा.पी.बी.पवार, प्रा.डी.एम. शिंब्रे, प्रा. सरोज, प्रा.जोशी , सचिन पवार , शफिरउल्ला सय्यद ,राहुल सुरडकर, सविता वाकोडे, शुभांगी ठोसरे यांनी परिश्रम घेतले.

Thursday, 29 April 2021

DIO BULDANA NEWS 29.4.2021

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधे पणाने; सकाळी 8 वाजता ध्वजारोहण बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्ष पुर्ण होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचवेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष इतक्याच पदाधिकारी / अधिकारी यांना उपस्थित रहावयाचे आहे. कार्यक्रमादरम्यान कवायत, संचलन आयोजनास मनाई आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयात येथेच ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ ठेवू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे यांनी कळविले आहे. ******************* औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण बुलडाणा,(जिमाका) दि.29 : राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक आदी उपस्थित होते. महाराष्ट्र हे देशात औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पन्नामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, राज्यातील औद्योगिक उत्पन्न काढणे, यासाठी नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगत व या क्षेत्रातील संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यामधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. आढाव यांनी कळविले आहे. --

Friday, 23 April 2021

DIO BULDANA NEWS 23.4.2021

*कोरोना अलर्ट : प्राप्त 4858 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1035 पॉझिटिव्ह* *733 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5889 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4858 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1035 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 565 व रॅपीड टेस्टमधील 470 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1179 तर रॅपिड टेस्टमधील 3675 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4858 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :208, बुलडाणा तालुका :रुईखेड 1, सागवन 2, देऊळघाट 2, उमाळा 1, सुंदरखेड 5, नांद्राकोळी 3, दहीद 2, पांगरी 1, जामठी 3, धाड 1, चौथा 5, वरवंड 2, डोमरूळ 4, तांदुळवाडी 2, करडी 4, पिं. सराई 11, जांभरून 4, कोलवड 2, गुम्मी 2, सव 1, रायपूर 4, जांब 1, डोंगर खंडाळा 1, ईरला 4, भादोला 1, साखळी 2, ढालसावंगी 3, मढ 1, दुधा 1, कुलमखेड 1, खुपगाव 1, सावळी 2, धामणगाव 1, वरुड 1, टाकळी 1, म्हसला 1, पाडळी 6, जनुना 2, मासरुळ 7, सिंदखेड 1, भडगांव 2, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : राजुर 1, जयपूर 5,चिंचपूर 2, पान्हेरा 1, अंत्री 1, बोराखेडी 1, पिं. गवळी 2, धा. बढे 5, रामगाव 1, कोल्ही गोलार 1, हनवत खेड 1, घुस्सर 13, काबरखेड 1, फर्दापूर 2, खामगांव शहर : 64, खामगांव तालुका :गारडगांव 2, उमरा 1, टेंभुर्णा 1, राहुड 2, पिं. राजा 2, दादुलगाव 1, निपाना 1, शिरसगाव 1, अंत्रज 1, घानेगाव 1, पोरज 1, आडगाव 6, पिंपरी कोरडे 1, लखनवाडा 1, शहापूर 1,पळशी 1, शेगांव शहर : 5, शेगांव तालुका : पहुरजिरा 1, नागझरी 1, तिंत्रव 1, चिखली शहर : 29, चिखली तालुका : चंदनपूर 3, माळशेंबा 1, भालगांव 3, बोरगांव काकडे 1, अंचरवाडी 2, मेरा खु 1, साकेगांव 2, मेरा बु 6, अंत्री खेडेकर 1, किन्होळा 2, पेठ 2, सवणा 3, डोंगर शेवली 2, आमोना 1, उन्द्री 1, असोला 1, दे. घुबे 1, भोगावती 1, भाणखेड 2, सावरगाव 1, इसरुळ 1, पळसखेड नाईक 1, इच्छापुर 1, खोर 1, धोडप 1, केळवद 1, धोत्रा 1, अंबाशी 1, भोरसा भोरसी 1, शेलुद 1, तांदुळवाडी 1, मंगरूळ 1, अंतरी 1, अमडापुर 1, मलकापूर शहर :8 , मलकापूर तालुका : उमाळी 5, देवधाबा 1, धरणगाव 8, हिंगणा काझी 7, अनुराबाद 11, नरवेल 4, दसरखेड 7, कुंड 4, धोंगर्डी 2, वाघोळा 1, पि. खूटा 2, वरखेड 1, भाडगणी 2, बहापूरा 1, दे. राजा शहर :19, दे. राजा तालुका : खैरव 1, सिनगांव जहा 3, पांगरी 3, सातेफळ 1, शिवणी आरमाळ 1, अंढेरा 1, गव्हाण 5, सरंबा 1, पिंपळगाव 2, कुंभारी 1, दगडवाडी 2, वाघजाई 3, असोला 1, जवळखेड 1, उंबरखेड 2, गोंधनखेड 1, डोलखेड 2, नागणगाव 1, दे. मही 2, बामखेड 6, मंडपगाव 1, भिवगन 1, गुंजाळा 2, पोखरी 1, पिंपलखुटा 3, मेंडगाव 1, सिं. राजा शहर : 13, सिं. राजा तालुका : केशवशिवणी 2, हनवतखेड 4, मलकापूर पांगा्र 1, दुसरबीड 1, हिवरा गडलिंग 1, आडगांव राजा 1, दरेगांव 15, वखारी 1, सावखेड तेजन 1, साखर खर्डा 6, पिंपरखेड 4, पळसखेड 1, वाघोरा 1, नसिराबाद 1, शेलगाव 1, राहेरी 1, वाकद 1, मेहकर शहर :80, मेहकर तालुका : उटी 1, हिवरा आश्रम 5, सावंगी माळी 1, नागझरी 1, भालेगांव 6, दे. माळी 7, चायगांव 1, शेंदला 4, परतापूर 3, ब्रम्हपूरी 3, शेलगांव काकडे 1, कल्याणा 5, डोणगांव 8, विश्वी 3, गोहेगांव 4, पार्डा 1, शाहपूर 1, आंध्रुड 2, अंजनी 3, जानेफळ 2, कळमेश्वर 13, घाटबोरी 1, बाबुळखेड 1, खामखेड 1, चोंडी 1, नेतनसा 3, नायगाव देश 3, उकळी 3, सोनाटी 3, सायाळा 2, कऱ्हळवडी 1, लोणी काळे 1, मादणी 1,शेळगाव 2, मालखेड 2, वरवंड 3, पाथर्डी 3,लोणी 2, शिंदी 1,वारोडी 1, वडगाव माळी 5, लोणी गवळी 1, घुटी 1, भोसा 2, बोरी 1, पांचाळा 1, खंडाळा 1, संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : बिलखेड 1, वसाडी 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : भेंडवळ 1, पिं.काळे 1, सून गाव 2, आडोळ 2, नांदुरा शहर : 15, नांदुरा तालुका : महाळुंगी 1, निमगांव 5, वाडी 5, तरवाडी 2, धानोरा 1, वडाळी 3, अंबोडा 3, पलसोडा 11, टाकारखेड 2, तिकोडी 1, पिंपरी आढाव 4, पि. खुट 1, कंडारी 1, चांदुर 1, वडनेर 1, दादुलगाव 1, माळेगाव 1, पोटळी 3, खंडाळा 1, लोन वडी 4, लोणार शहर :2, लोणार तालुका : पिंपळनेर 2, देऊळगांव कोळ 3, बिबी 4, भुमराळा 1, कोयाळी 2, शिंदी 1, आगेफळ 1, चिखला 2, देवा नगर 1, परजिल्हा केनवड 1, पातूर 4, औरंगाबाद 1, अकोला 1, जळगाव 1, जालना 1दर्यापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 1035 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान किन्होळा ता चिखली येथील 27 वर्षीय महिला, बोरगाव काकडे ता चिखली येथील 58 वर्षीय महिला, सालीपुरा मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष, धाड ता. बुलडाणा येथील 67 वर्षीय पुरुष व कुंबेफळ ता. बुलडाणा येथील 58 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 733 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 322950 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 49031 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 49031 आहे. आज रोजी 4658 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 322950 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 56735 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 49031 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 7343 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 361 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ************ कामगारांच्या तक्रारी व स्थलांतरित कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन बुलडाणा, (जिमाका) दि. २३: कोविड-१९ विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या गंभीर परिस्थीतीमुळे कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडणे करीता दिनांक १मे पर्यंत सकाळी ७ वाजेपावेतो संपुर्ण राज्यात संचार बंदी (लॉकडाऊन) सुरु झालेली असुन पुढील आदेशापर्यंत ती लागु राहणार आहे. शासनाद्वारे १३ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालयस्तरावर जिल्हयातील कामगारांच्या तक्रारी तसेच आंतरराज्यीय स्थलांतरीत कामगारांच्या समस्या निराकारण करण्याकरीता मदत कक्ष, नियंत्रण कक्ष, तक्रार निवारण कक्ष, स्थापन करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा या कार्यालयाच्या दुरध्वनीक्रमांक ०७२६२-२४२६६३ यावर स्थलांतरीत कामगारांच्या समस्या निराकरण तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असुन विभाग स्तरावर भ्रमणध्वनी क्रमांक ८६६८४९६४१८ यावर सोशल मिडीया माध्यमातुन जसे की व्हाटसअप, एसएसएस, किंवा प्रत्यक्ष संपर्क साधल्यास संबंधित कामगारांचे निराकारण करण्यास्तव उचित कार्यवाही करणे शक्य होईल. तरी बुलडाणा जिल्हयातील कामगारांनी वरील दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे. ******** *महावीर जयंती व हनुमान जयंती साधे पणाने साजरी करावी* *जिल्हा प्रशासनाचे आवाहन* *उत्सवाविषयी मार्गदर्शक सूचना जारी* बुलडाणा, दि. २३ (जिमाका) : राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भावाचा अनुषंगाने सर्व सण, उत्सव हे अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न जमता करण्यात येत आहेत. त्यामुळे २५ एप्रिल २०२१ रोजी साजरा होणारा महावीर जयंती उत्सव व २७ एप्रिल रोजी साजरा होणारा हनुमान जयंती अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे महावीर व हनुमान जयंती उत्सव मोठ्या संख्येने एकत्रित येवून साजरी न करता, हा उत्सव साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा-अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिरामधील व्यवस्थापक अथवा विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून द्यावी. महावीर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत. कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंतीच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे. *****

Tuesday, 20 April 2021

DIO BULDANA NEWS 20.4.2021

मासेमारी करताना मृत्यूमुखी पडलेल्या अरूण किकराळे यांच्या कुटूंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान बुलडाणा,(जिमाका) दि.20: येळगांव जलाशयामध्ये मासेमारी करतांना कै. अरुण आनंदा किकराळे यांचा मुत्यू झाला आहे. अरुण आनंदा किकराळे हे मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे सभासद होते. मच्छिमारांना मच्छिमार कायदयाने वारसदारांना उदनिर्वाहा करीता निधी दिला जातो. तसेच मृतकाची पत्नी श्रीमती अलका अरुण किकराळे यांना शासनाने मासेमारी संकट निवारण निधी योजने अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयामार्फत 1 लाख रुपये निधी सहाय्यक आयुक्त स. इ. नायकवडी यांचे हस्ते मृत मच्छिमारांचे वारसदार यांना दि. 16 एप्रिल 2021 रोजी धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे अध्यक्ष तुकारात आनंदा किकराळे, सचिव सुभाष गंगाराम राऊळकर, मनोहर राजाराम घट्टे, जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष दादाराव जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी इं. तु. देवकत्ते उपस्थित होते, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)स. इ. नायकवडी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 0000000 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन कोविड साथरोग पार्श्वभूमी बुलडाणा, (जिमाका) दि.20: सध्या राज्यात कोविड - 19 साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम 2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी 24 तास संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275340540, 8830152010 तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 संपर्क साधावा. सोबत अडचण किंवा तक्रार dsaobuldana.qc @gmail.com, ado.buldana@yahoo.in ई मेल वर पाठवावे किंवा नोंदवता येणार आहे. तसेच ई -मेल वर येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतांना आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक थोडक्यात किंवा सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा छायाचित्र व्हॉट्सॲप किंवा ई - मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप वापर करणे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी वर तोंडी तक्रार नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 000000000 अवैध सालई गोंद व लाकडे जप्त; भिंगारा ते निमखेडी मार्गावरील कारवाई बुलडाणा, (जिमाका) दि.20: वनविभागाअंतर्गत जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात दि. 12 एप्रिल 2021 रोजी सकाळी अंदाजे 5 वाजता निमखेडी बिट वनखंड 371 मध्ये भिंगारा ते निमखेडी मार्गावर रात्रगस्त करीत असतांना चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच – 20 बी सी 397 दिसून आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गाडी जंगलात सोडून पळ काढला. आरोपीची वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपी तेजराज अशोक लोणी जळगांव जामोद येथील राहणार असल्याची खात्री केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगांव जामोद यांनी नमूद केले आहे. सदर आरोपीने टाटा इंडिगो गाडी व भ्रमणध्वनी सोडून पळ काढला आहे. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या सालई गोंद व 8 कट्टे आढळून आले सदर गोंद मालाचे पंचनामा करुन वजन केले असता 265 कि. लो. भरले. याबाबत वनगुन्हा क्र. 665/16601 दि 12 एप्रिल 2021 अन्वये जारी करण्यात आला आहे. तसेच सदर माल व वाहन, भ्रमणध्वनी जप्त करुन लाकुड जळगांव जामोद आगारात ठेवण्यात आले आहे. सदर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) जळगाव जामोद व वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत. आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 ड, फ, ग, 41, 42, 52,61 ए,69 महाराष्ट्र वननियमावली नियम 2014 चे नियम 31,82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया, जळगांव जामोद, वनपाल पी. जी. सानप, वनरक्षक ए. आर. खेडकर, आर. व्हि. फड, बी. एम. खेडकर, वनविभागाचे कर्मचारी यांनी वरील प्रमाणे कारवाई केली आहे. तसेच अवैध सालई गोंद, अवैध वाहतुक,शिकार तस्करी, वृक्षतोड ची तक्रार बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहन उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. --

Monday, 19 April 2021

DIO BULDANA NEWS 19.4.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 2002 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 874 पॉझिटिव्ह 691 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2876 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2002 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 874 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 724 व रॅपीड टेस्टमधील 150 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1127 तर रॅपिड टेस्टमधील 875 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2002 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 158, बुलडाणा तालुका : सुदंरखेड 3, अजिसपूर 1, ढालसावंगी 1,करडी 1, देऊळघाट 2, मासरूळ 3, बिरसिंगपूर 1, डोंगरखंडाळा 1, टाकळी 1, नांद्राकोळी 1, मढ 1, कोलवड 1, दुधा 1, सागवन 3, चांडोळ 1, कुंबेफळ 2, पोखरी 1, पिं. सराई 2, सावळी 2, मोताळा शहर : 2 , मोताळा तालुका :पिंपळगावनाथ 1, बोराखेडी 1, गोतमारा 2, काबरखेड 2, राजुर 1, तरोडा 2, रोहीणखेड 1, आडविहीर 1, वडगांव 2, शेलापूर 2, आव्हा 1, खामगांव शहर : 55, खामगांव तालुका : कारेगांव 1, लांजुड 1, चारोळा 2, जयपूर लांडे 1,शेलोडी 3, बोथाकाजी 2, बोरी अडगांव 4, चिखली 1, चिंचपूर 1, विहीगांव 1, उमरा अटाळी 1, गारडगांव 1, कोलोरी 1, शेगांव शहर : 38, शेगांव तालुका : आडसूळ 1, खेर्डा 4, तिंत्रव 3, लासुरा 2, आळसणा 1, जलंब 2, चिचखेड 1, मच्छींद्रखेड 1, वरखेड 1, सवर्णा 2, कालखेड 1, जानोरी 1, चिखली शहर : 31, चिखली तालुका : दहीगांव 1, चांधई 1, दिवठाणा 2, शिंदी हराळी 1, अमडापूर 3, डोंगरशेवली 1, पळसखेड जयंती 1, साकेगांव 1, सोमठाणा 1, मेरा खु 1, खंडाळा 1, भालगांव 1, काटोडा 2,मालखेड 2, सवणा 4, मंगरूळ नवघरे 1, कोलारा 1, अंत्री कोळी 1, गजरखेड 2, बोरगांव काकडे 1, येवता 1, पळसखेड 1, शेलूद 2, मलगी 1, खेर्डी 1, मेरा बु 3, तांदुळवाडी 1, अंत्री खेडेकर 1, देवधारी 1, अमोना 12, मलकापूर शहर : 47, मलकापूर तालुका : धरणगांव 1, माकनेर 2, वाघोडा 1, वाघुळ 1, हरणखेड 3, अनुराबाद 1, वरखेड 1, देवधाबा 1,वाकोडी 1, शिवणी 1, दुधलगांव 1, घोंगर्डी 1, दे. राजा शहर : 48, दे. राजा तालुका : डोईफोडेवाडी 1, गिरोली 1, सावखेड भोई 3, मेहुणा राजा 2, बेलोरा 1, पांगरी 2, वखारी 2, सिनगांव जहा 4, गोंधनखेड 1, नंदखेड 1, नागणगांव 1, असोला 1, उंबरखेड 1, वाघ्रुळ 1, खैरव 3, गारखेड 1, टाकरखेड वायाळ 1, गोंडेगांव 1, किन्ही 1, गव्हाण 1, दहेगांव 1, पिंपळगांव 1, दे. मही 4, अंढेरा 2,वाघजई 1, सिं. राजा शहर : 9, सिं. राजा तालुका : सायाळा 2, दरेगांव 3, वाडी 1, पळसखेड झाल्टा 1, पिंपरखेड 2, पिं. सोनारा 2, साखरखेर्डा 7, भोसा 1, नसिराबाद 1,सावखेड तेजन 3, वाघोरा 1, वाघाळा 1, आडगांव राजा 3, पिंपळखुटा 3, सावंगी भगत 1, वारोडी 1, शिंदी 1, सोनोशी 1, बाळसमुद्र 5, सोयंदेव 1,हनवतखेड 1, हिवरा गडलिंग 1, मेहकर शहर :29, मेहकर तालुका : चायगांव 1, धानोरा 2, खंडाळा 1, नागापूर 1, शेंदला 1,सुकळी 1, बाभुळखेड 1, आरेगांव 1, चिंचोली बोरे 1, शिवपूरी 1, दुर्गबोरी 1, संग्रामपूर शहर :4 , संग्रामपूर तालुका : रिंगणवाडी 2, एकलारा 1, कथरगांव 3, कुंभारखेड 1, वकाणा 4, रूधाना 2, सावळा 1, वानखेड 5, वसाडी 1, सगोडा 1, सोनाळा 2, टुनकी 2, दुर्गादैत्य 2, शिवणी 1, जळगांव जामोद शहर :7, जळगांव जामोद तालुका : काजेगांव 1, आडोळ 2, झाडेगांव 1, पिं. काळे 2, इस्लामपूर 1, सुलज 2, वडगांव पाटण 2, पळशी सुपो 1, नांदुरा शहर :6, नांदुरा तालुका :पोटळी 1, वडगांव 1, पिंपळखुटा 1, इसापूर 1, टाकळी 2, हिंगणे गव्हाड 4, तरवाडी 1, चांदुर 2, वडनेर 10, वाडी 2, धानोरा 3, बेलाड 1, टाकरखेड 6, पोटा 63, डिघी 5, जिगांव 1, लोणार शहर : 8, लोणार तालुका : शिवणी पिसा 1, भुमराळा 1, सरस्वती 2, गुंजखेड 1, पळसखेड 1, अंजनी 2, तांबोळा 1, वढव 3, अजिसपूर 2, शारा 1, जांभुळ 1, पिंपळनेर 4, पिंप्री 1, आरडव 1, पिंप्री खंडारे 3, चिखला 1, शिंदी 2, बिबी 1, सावरगांव 1, खळेगांव 2, मातमळ 1, देऊळगाव कोळ 2, परजिल्हा वालसावंगी 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 874 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वडगांव ता. दे. राजा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 691 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 302437 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 46277 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 46277 आहे. आज रोजी 4825 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 302437 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 53173 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 46277 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6561 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 335 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******************* डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड *निवड झालेल्या लाभार्थ्यांनी 10 दिवसाचे आत महाडीबिटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावी बुलडाणा, (जिमाका) दि.19: राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शिर्षकांतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी सन 2020-21 साठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्या लाभार्थ्यांने योजने संबधी सर्व आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी या वेबसाईटवर 10 दिवसाचे आत अपलोड करणे गरजेचे आहे. सदर लाभार्थ्यांने अर्ज केलेल्या बाबीचा यापुर्वी विहीरीचा लाभ घेतलेला असल्यास शासकीय नोकरीत असेल किंवा लाभार्थ्याने यापुर्वी विहीरीचा लाभ घेतलेला असलयास लाभार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, यांची संबंधितानी नोंद घ्यावी, या योजनेसाठी खालील कागदपत्रे महाडीबीटी वेबसाईट वर अपलोड करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे नावाचा 7/12 सर्व शिवारातील, शेतीचा नमुना 8 अ सर्व शिवारातील, आधार कार्ड, सन 2020-21 चा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड छायांकित प्रत, जातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी यांनी निर्गमित केलेला असावा), बॅक पासबुक छायांकित प्रत, शेतीचा चतुर्सिमा नकाशा प्रत, लाभार्थी अथवा कुटूंबात कोणाकडेही विहीर अथवा जलसिंचन चे साधन नाही व कोणीही सदस्य शासकीय नोकरीवर नाही किंवा पेन्शनर नाही असे स्वयंघोषित प्रत, ग्रामपंचायत चा ग्रामसभा ठराव पत्र, 7/12 मध्ये दोन जास्त नावे असल्यास 100 रुपये स्टँप पेपर वर संमतीपत्र तहसीलदार यांच्या समक्ष प्रतिज्ञालेख करावा, सर्व कागदपत्रे महाडीबीटी वेबसाईट वर अपलोड करावे नंतर संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांचेकडे जमा करावे, या व्यतिरिक्त सदर कामासाठी कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास संबंधित पंचायत समिती यांचे कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ****** रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा जिल्हा दौरा बुलडाणा, (जिमाका) दि.19: रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता वाशिम जिल्हा येथून अंजनी बु. ता. मेहकरकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता अंजनी बु. ता.मेहकर येथे आगमन व मनरेगा कामास भेट, पाहणी, दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह मेहकर येथे आगमन, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यत राखीव, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह मेहकर येथून सिंदखेड राजा मार्गे औरंबादकडे प्रयाण करतील. *********** काही बाबी वगळता जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील काही बाबी वगळता इतर अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना / दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध विक्री व वितरण केंद्र सकाळी 6 ते सकाळी 11 व सायं 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा व नगर पालिका, महावितरण ही कार्यालये 24 तास सुरू राहतील. जिल्हयातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. पेट्रोल पंप हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. हायवेवरील व शहर / गावाबाहेरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहतील. खाजगी वाहतुक अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. तथापी संबंधीतांना सोबत आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतुक नियमितरित्या सुरू राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ रूग्णालये, मेडीकल, किराणा दुकान, भाजीपाला, फळ दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे दुकान, सुरू राहतील व इतर सर्व सेवा बंद राहतील. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीच्या इतर सेवा 24 तास सुरू राहतील. सदर आदेश 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.

Wednesday, 14 April 2021

DUO BULDANA NEWS 14.4.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 2742 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 676 पॉझिटिव्ह 346 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2742 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 676 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 504 व रॅपीड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 938 तर रॅपिड टेस्टमधील 1804 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2742 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :97, बुलडाणा तालुका :भादोला 1, कोलवड 2, हतेडी 1, पि. सराई 2, देऊळघाट 1, येळगांव 3, सव 2, सुंदरखेड 2, नांद्राकोळी 2, खुपगांव 1, तांदुळवाडी 1, गुम्मी 1, धाड 2, म्हसला 1, दुधा 1, साखळी खु 1, सागवन 1, पिंपळगांव 1, पांगरी 1, मासरूळ 1, साखळी बु 1, माळवंडी 1, कुंबेफळ 1, दहीद 1, सावळी 1, अजिसपूर 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : पिं. गवळी 1, धा. बढे 6, किन्हेळा 2, खेर्डी 1, लपाली 1, सिंदखेड 2, पोखरी 1, कोऱ्हाळा 1, राजुर 5, सारोळा मारोती 3, माकोडी 1, खामगांव शहर :18, खामगांव तालुका : विहीगांव 1,सुटाळा 1, ढोरपगांव 2, पळशी 1, बोथाकाजी 1, काबरखेड 1, पि.राजा 1, गारडगाव 1, शेगांव शहर :37, शेगांव तालुका : गोरेगाव 1, मच्छींद्रखेड 1, लोहारा 1, आळसणा 3, पहुरपुर्णा 1, सगोडा 1, लासुरा 1, चिखली शहर : 19, चिखली तालुका : शेलूद 2, पळसखेड जयंती 1, सवणा 1, किन्होळा 2, ब्रम्हपूरी 3, टाकरखेड 1, अंचरवाडी 1, गांगलगाव 1, पिंप्री आंधळे 1, मेरा खु 3, अमडापूर 3, हराळखेड 1, चिंचखेड 1, मलकापूर शहर :18, मलकापूर तालुका : विवरा 1, अनुराबाद 1, चांदुर 1, मोरखेड 1, शिवणी 2, घोंगर्डी 1, वडजी 2, वरखेड 1,भालेगांव 1, लासुरा 1, दे. राजा शहर : 48, दे. राजा तालुका : कुबेफळ 2, बायगांव 1, सावखेड 1, खुळेगाव 1, दे. मही 8, खैरव 1, मंडपगांव 1, अंढेरा 1, गव्हाण 1, सरंबा 4, सावंगी टेकाळे 1, चिंचखेड 6, डोढ्रा 1, गारखेड 1, रोहणा 1, पळसखेड 1, उंबरखेड 3, सिनगांव 10, किन्ही पवार 1, गोंधनखेड 2, पांगरी 2, वाघजई 1, डोलखेड 1, पिंपळगांव 2, असोला 1, सावंगी 1, सिं. राजा शहर : 26, सिं. राजा तालुका : वडाळी 3, भोसा 1, वडगांव 1, सावखेड 2, सावरगांव 1, पोफळशिवणी 1,मलकापूर पांग्रा 4, देवखेड 3, चांगेफळ 2, सोनोशी 1, जांभोरा 1, कि. राजा 1, धानोरा 3, दुसरबीड 1, महारखेड 1, पळसखेड चक्का 2, शिवणी टाका 1, साखरखेर्डा 6, शेंदुर्जन 2, हनवतखेड 1, जळगांव 1, ताडेगांव 1, सायाळा 1, वखारी 2, बाळसमुद्र 1, शेंदुर्जन 2, नाव्हा 1, दरेगांव 1, मेहकर शहर :44, मेहकर तालुका : नायगांव दत्तापूर 2, गोरेगांव 1, विश्वी 1, जानेफळ 9, हिवरा आश्रम 2, बऱ्हाई 2, ब्रम्हपूरी 1, मोळा 2, उकळी 1, वरूड 1, दे. माळी 4, शेंदला 1, कोयाळी 1, वडद 1, नागापूर 1, वारूडी 1, अकोला ठाकरे 3, वेणी 1, डोणगांव 3, मादनी 1, किन्ही नाईक 1, शेलगांव काकडे 1, संग्रामपूर शहर :2, संग्रामपूर तालुका :चावरा 1, पातुर्डा 1, कवठळ 1, टुनकी 1, इटारखेड 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, कुरणगड 5, निंभोरा 1, भेंडवळ 2, नांदुरा शहर : 28, नांदुरा तालुका : पोटा 1, निमगांव 3, बेलाड 1, वसाडी 1, अंबोडा 1, दहीगांव 1, गौलखेड 1,महाळुंगी 1, वडनेर 5, डिघी 1, टाकळी वतपाळ 6, माळेगांव 2, नायगांव 1, जयपूर 3, पोटळी 1, चांदुर 5, कोकलवाडी 1, नारखेड 1, तांदुळवाडी 1, लोणार शहर :2, लोणार तालुका : शारा 1, सुलतानपूर 1, टिटवी 1, ब्राम्हणचिकना 3, पिंप्री 1, गोवर्धन 4, भुमराळा 1, बिबी 2, पळसखेड 2, परजिल्हा निंबा ता बाळापूर 1, बाळापूर 3, कुऱ्हा काकोडा 1, खडका 1,घोडसगाव 2, बोदवड 3, रिसोड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 676 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान नांदुरा येथील 58 वर्षीय महिला व घाटपुरी रोड, खामगांव येथील 73 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 346 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 280805 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 42122 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 42122 आहे. आज रोजी 4003 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 280805 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 48122 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 42122 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5685 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 315 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********** जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन बुलडाणा,(जिमाका) दि.14 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. *********
पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली कोविड रूग्णालयातील सुविधांची पाहणी बुलडाणा,(जिमाका) दि.14 : शहरातील कोविड समर्पित रूग्णालयाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी 13 एप्रिल रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील विविध आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. काम करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, कोविड रूग्णालयाचे डॉ पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी ऑक्सीजनचा साठा असलेल्या 20 के.एल टँक, डयुरा सिलेंडर्स, जंबो सिलेंडर्स, रूग्णापर्यंत होत असलेला पुरवठा व गळती याबाबत पाहणी केली. ऑक्सीजन हा सध्या अत्यंत महत्वाचा असून त्याची गळती होता कामा नये. गळतीमधून कुठल्याही प्रकारे ऑक्सीजन वाया जावू देवू नये. रूग्णालय परिसरात रूग्णांचे नातेवाई उन्हात थांबलेले असतात, या ठिकाणी नातेवाईकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पेंडाल उभारण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे याठिकाणी आणखी 20 के. एल चा ऑक्सिजनचा टँक लावून बाजुच्या अपंग विद्यालयात कोविड हॉस्पीटलचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पाहणी केली. याठिकाणी लवकारात लवकर बेडची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ***********

Sunday, 11 April 2021

DIO BULDANA NEWS 11.4.2021

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन बुलडाणा, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दि. 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार श्री. साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. ************** भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि.11: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र जमून तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजूपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्याठिकाणी एकाचवेळी अनुयायांची संख्या 5 पेक्षा अधिक असू नये. तसेच सामाजिक अंतराचे पालन व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमी येथे गर्दी जावू नये. तेथील कार्यक्रमाचे दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी दादर येथे न येता घरातूनच परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, पथनाट्य व्याख्यानाचे आयोजन किंवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण केबलद्वारे किंवा ऑनलाईन करण्याची व्यवस्था करावी. यादिवशी प्रशासनाच्या परवानगीने आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 00000 शासकीय कार्यालयात अभ्यांगतांसाठी आरटीपीसीआर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र आवश्यक अत्यंत महत्वाचे काम असल्यासच कार्यालयात यावे निवेदनेही ऑनलाईन ईमेल आयडीवर स्वीकारण्यात येतील बुलडाणा, (जिमाका) दि.11: महसुल व वन विभागाच्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येवू नये. तसेच शासकीय कार्यालयात अति आवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासातील प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येवू नये. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिआवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासातील प्रमाणपत्र सोबत ठेवावे. सदर निर्देश सोमवार 12 एप्रिलपासून लागू होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे निवेदन देण्यासाठी न येता ऑनलाईन collector.buldhana@ maharashtra.gov.in व rdc_buldhana@rediffmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. ************
ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा व वापराचे योग्य नियोजन करावे - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे डायलिसीसवरील रूग्ण पॉझीटीव्ह निघाल्यास त्याची स्वतंत्र व्यवस्था करावी ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक बुलडाणा, (जिमाका) दि 11 : जिल्हयात दिवसेंदिवस कोविड रूग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी गाफील राहू नये. आलेल्या परिस्थितीवर मात करीत यंत्रणांनी ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा व वापराचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आज दिल्या. कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेवून जिल्हयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, शासकीय रूग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होता कामा नये. डायलिसीसवरील रूग्ण जर पॉझीटीव्ह निघाल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच त्याचे नियमित डायलिसीस करण्यात यावे. रेमडेसिवीरचा जास्त वापर झाल्यास रूग्णांना साईड इफेक्ट होवू शकतात. त्यामुळे अतिआवश्यक असल्यासच त्याचा वापर करावा. जे खाजगी रूग्णालये कोविडवरील उपचार करीत आहेत, त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही हे तपासून बघावे. त्यांना नियमानुसार परवानगी दयावी. तसेच खाजगी रूग्णालये रूग्णांकडून अवाजवी रक्कम घेत तर नाही ना याबाबतही तपासणी करावी. ते पुढे म्हणाले, जिल्हयात प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक कोविड रूग्णालय तयार करता येईल का याबाबत जिल्हाधिकारी यांनी चाचपणी करावी. सिं. राजा येथील शासकीय रक्तपेढी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. परिस्थिती बघता राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला जिल्हावासियांनी समर्थ द्यावे. यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझीटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. --

Friday, 9 April 2021

DIO BULDANA NEWS 9.3.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 4792 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 619 पॉझिटिव्ह 784 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5411 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4792 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 619 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 312 व रॅपीड टेस्टमधील 307 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 556 तर रॅपिड टेस्टमधील 4236 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4792 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 98, बुलडाणा तालुका :गोंधनखेड 1, मासरूळ 1, कुलमखेड 2,डोमरूळ 2, टाकळी 1, धाड 3, जांब 1, रूईखेड 2, पिं. सराई 2, सागवन 1, सावळी 5, म्हसला 1, कुंबेफळ 1, चांडोळ 1, करडी 1, रायपूर 5, मोताळा शहर :6 , मोताळा तालुका : पिं. देवी 2, शेलापूर 1, निपाणा 1, माळेगांव 1, आव्हा 3, उऱ्हा 2, धानखेड 1, वरूड 1, जयपूर 5, पुन्हई 1, उबाळखेड 2, मुर्ती 1, रोहीणखेड 3, धा. बढे 6, किन्होळा 1, खामगांव शहर : 46, खामगांव तालुका : अंत्री 1, सुटाळा 3, पारखेड 1, टेंभुर्णा 1, गणेशपूर 1, बोरजवळा 1, सज्जनपूरी 1, कोलोरी 1, रोहणा 1, हिवरा 2, आंबेटाकळी 1, शेगांव शहर : 26, शेगांव तालुका : मानेगांव 1, पहुरजिरा 1, मोरगांव 1, खेर्डा 1, टाकळी धारव 1, हिंगणा 1, मच्छींद्रखेड 1, गौलखेड 1, शिरसगांव 1, नागझरी 1, जवळा 1, माटरगांव 2, चिखली शहर :8 , चिखली तालुका :इसोली 1, मुरादपूर 1, शेलूद 3, अंत्री खेडेकर 12, चंदनपूर 1, रोहडा 1, खैराव 1, कोलारा 1,कनारखेड 1, माळशेंबा 2, पळसखेड नाईक 2, मलकापूर शहर :73, मलकापूर तालुका : बहापूरा 1, वाघुड 1, देवधाबा 1, दुधलगांव 1, वडोदा 1, घिर्णी 3, दाताळा 2, दसरखेड 1, भानगुरा 1, उमाळी 1, दे. राजा शहर : 33, दे. राजा तालुका : चिंचखेड 4, दे. मही 3, गोळेगांव 1, निमखेड 3, डोईफोडेवाडी 1, असोला 1, गिरोली 1, गोंधनखेड 1, बोरखेडी 1, अंढेरा 2, भिवगण 1, कव्हाळेवाडी 1, दिग्रस 1, सिनगांव जहा 2, वाकी 1, सावंगी टेकाळे 1, सरंबा 1, सिं. राजा शहर :2 , सिं. राजा तालुका : वसंत नगर 1, सोयगांव 1, दुसरबीड 3, साखरखेर्डा 3, डावरगांव 1, आलापूर 1, मेहकर शहर :21, मेहकर तालुका : खार 1, राजेगांव 1, हिवरा आश्रम 1, दे. माळी 2, भालेगांव 1, गोमेधर 1, शेलगांव दे 1, पांगरखेड 1, कनका 1, जनुना 1, डोणगांव 2, खापरखे 1, सावरखेड 1, लोणी गवळी 2, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 2, वरवट बकाल 1, बोडखा 1, निवाणा 1, आलेवाडी 1, जळगांव जामोद शहर :5, जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, निंभोरा 1, पिं. काळे 1, कुरणगड 1, नांदुरा शहर : 18, नांदुरा तालुका :डिघी 2, वडनेर 9, धानोरा 1, चांदूर बिस्वा 1, लोणवडी 1, शेलगांव मुकूंद 3, टाकरखेड 2, पोटा 3, काटी 1, चिखली बु 1, खुरकुंडी 1, माटोडा 1, आलमपूर 4, हिगणे गव्हाड 3, भरोडा 1, लोणार शहर :6 , लोणार तालुका : सावरगांव 2, पळसखेड 1, वेणी 1, घाटनांद्रा 1, जांभूळ 1, पिंपळनेर 1, टिटवी 5, बिबी 15, सुलतानूपर 8, वायसा 1, दाभा 2, परजिल्हा सावळदबारा 1, औरंगाबाद 1, मंठा 2, बाळापूर 1, मोथा ता. मुक्ताईनगर 1, इटारसी मध्यप्रदेश 2, जालना 1, मोप जि वाशिम 1, माहोरा ता. जाफ्राबाद 1, रिसोड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 619 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान दहीद ता. बुलडाणा येथील 47 वर्षीय पुरूष, जयपूर ता. मोताळा येथील 65 वर्षीय पुरूष, भोरसा भोरसी ता. चिखली येथील 60 वर्षीय पुरूष, चांगेफळ ता. मेहकर येथील 32 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 784 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 259044 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 38402 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 38402 आहे. आज रोजी 5081 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 259044 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 44446 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 38402 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5745 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 299 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ******
जिल्ह्यात शासनाचे नियम मोडणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई • सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर करण्याचे केले आवाहन • जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांची कारवाई बुलडाणा,(जिमाका) दि. 9 : जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही. जिवनाश्वयक वस्तु वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: आज बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणाऱ्या काही दुकानांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली व त्यांना नियमानुसार दंड ठोठाविला. कारवाई करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गापासून स्वत:चे व कुटूंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग नियम पाळावा व हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Thursday, 8 April 2021

DIO BULDANA NEWS 8.4.2021

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा दोन सदस्यीय पथक बुलडाणा,(जिमाका) दि.8 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ दृष्टी सुंदरदास, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अति. आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांच्या कक्षात पुन्हा तालुकानिहाय कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझीटीव्हीटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदींची माहिती घेतली. तसेच कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाची माहिती घेतली. दररोज होणारे लसीकरण आदींची माहिती घेतली. लसीकरण सेंटर, तेथे असणाऱ्या सुविधा, कोविड रूग्णालयांमधील बेड, ऑक्सीजन बेड, आयसीयु युनीट, व्हेंटीलेटर आदींचा आढावाही पथकाने घेतला. तसेच ऑक्सीजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा आदींचा आढावा घेवून कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन, सामाजिक अंतर नियम, मास्क लावणे, गर्दी टाळे आदी नियमांच्या अंमलबजावणीसुद्धा माहिती पथकाने घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली. बैठकीनंतर तालुक्यातील लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर व शासकीय रूग्णालयांना पथकाने भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमावेत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******* 5 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 3 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर बुलडाणा,(जिमाका)दि. 8 : जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, खामगांव व मोताळा तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा बु, खामगांव तालुक्यातील पाळा, मोताळा तालुक्यातील राजूर व सिं. राजा तालुक्यातील खैरव, सायाळा या गावांसाठी पाणी टंचाई नि‍वारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. तसेच सिं. राजा तालुक्यातील लिंगा, आंबेवाडी व दरेगांव येथे नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे. ********* सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सिं. राजा तालुक्यातील सावरगांव माळ, बुलडाणा तालुक्यातील सावळा व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सावरगांव माळ येथील लोकसंख्या 1920 असून सावळा येथील 797 आहे. तसेच कोलारा येथील लोकसंख्या 4995 आहे. सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावाला अनुक्रमे टँकरद्वारे दररोज 40 हजार 475, 31 हजार 840, 1 लक्ष 79 हजार 100 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, सिं.राजा व बुलडाणा यांनी कळविले आहे.

Wednesday, 7 April 2021

DIO BULDANA NEWS 7.4.2021

 


           दस्त नोंदणीकरीता कोविडचा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य

  • दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणारे पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या पक्षकार यांचेकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. सदर रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. सदरची कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

******

                                     दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांनी दक्षता घ्यावी

  • सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दुय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करीता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांनी दक्षता घ्यावी. नागरीकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्यापूर्वी आपली दस्त नोंदणीची वेळ आरक्षीत करून घ्यावी. आरक्षीत वेळेलाच दस्त नोंदणीसाठी यावे, प्रथमत : केवळ दस्त सादर करणाऱ्या एका पक्षकारास व वकीलास (असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्त छाननी, सादरीकरण शिक्का 1 व 2 पुर्ण झाल्यावरच इतर पक्षकारांना दस्तात नमूद नावानुसार क्रमवारी प्रवेश दिला जाईल. पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात आल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात ठरवून दिलेल्या अंतरावरच उभे रहावे, तसेच कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क, हात सॅनिटायझरने स्वच्छ करून नंतरच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्तावर सह्या करण्यासाठी दस्तातील प्रत्येक पक्षकाराने स्वत:चा पेन सोबत आणावा. एकमेकांचा पेन वापरू नये, नोटीस ऑफ इटिमेंशन फिजीकल फायलिंग सद्यस्थितीत बंद करण्यात आले असून ई फायलिंगचा वर्जन 1 व वर्जन 2 चा पर्याय उपलब्ध आहे. तरी त्याचा वापर करण्यात यावा. दस्त नोंदणी झाल्यानंतर  लगेच कार्यालयाच्या बाहेर पडावे, विनाकारण कार्यालयाच्या आवारात गर्दी करू नये. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

******

                       ‘ब्रेक द चेन’ आदेशान्वये आणखी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 4 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेनचा कडक निर्बंध असणारा आदेश लागू केला. या आदेशामध्ये नसलेल्या काही अत्यावश्यक सेवा 5 एप्रिल 2021 रोजी च्या सुधारीत आदेशानुसार सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी 6 एप्रिल रोजी सुधारीत आदेश लागू केले आहे.  या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये पेट्रोल पंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डाआ सेंटर्स / क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर्स/ आयटी संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, टायर पंक्चरची दुकाने, पुर्वनियोजीत परीक्षा यांचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच सेबी  किंवा सेबी मान्यताप्राप्त संस्था, रिझर्व् बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स, सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, वकीलांची कार्यालये, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर आदी खाजगी आस्थापना आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संबंधीत कर्मचाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्यावे. शनिवार व रविवार संचारबंदीच्या काळात रेल्वे, बसेस यातून प्रवास  करून आगमन होणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत तिकिट बाळगावे. जेणेकरून त्यांना संचारबंदीच्या काळात स्थानकापर्यंत किंवा त्यांचे घरापर्यंत जाणे सोयीचे होईल. औद्योगिक कामगारांना कामाच्या शिफ्टनुसार कामाचे ठिकाणी जाण्या / येण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत अथवा शनिवार / रविवार संचारबंदीच्या काळात, खाजगी बसेस , वाहनाने प्रवास करण्यास मुभा राहील. सर्व नागरिकांसाठी धार्मिक संस्थांने बंद राहतील. विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाणी प्रत्यक्ष जाणे आवश्यक असल्यास सदर परीक्षा ठिकाणी जाण्यास किंवा घरी येण्यासाठी रात्री 8 वाजेनंतर तसेच शनिवार व रविवार संचारबंदीच्या कालावधीत सुद्धा प्रवास करण्यास मुभा राहील. परंतु परीक्षेचे अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. शनिवार व रविवार संचारबंदीच्या कालावधीत लग्न समारंभ असतील, तर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन संबंधित तहसिलदार सदर कार्यक्रमास परवानगी देऊ शकतील . या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमांनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

*********

कोरोना अलर्ट : प्राप्त 4839 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 626 पॉझिटिव्ह

  • 792 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5465 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4839 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 626 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 325 व रॅपीड टेस्टमधील 301 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 585 तर रॅपिड टेस्टमधील 4254 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4839 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका :126,  मोताळा शहर व तालुका : 29, खामगांव शहर व तालुका : 53,  शेगांव शहर व तालुका :4,   चिखली शहर व तालुका : 34,   मलकापूर शहर व तालुका : 68, दे. राजा शहर व तालुका : 37, सिं. राजा शहर व तालुका : 12, मेहकर शहर व तालुका : 97,   संग्रामपूर शहर व तालुका : 22,   जळगांव जामोद शहर व तालुका : 3,   नांदुरा शहर व तालुका : 71,    लोणार शहर व तालुका : 70 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 626 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सारोळा मारोती ता. मोताळा येथील 65 वर्षीय पुरूष व गांधी नगर मलकापूर येथील 74 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 792  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 249416 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 37245 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  37245आहे. 

  आज रोजी 3435 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 249416 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 43221 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 37245 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5685 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 291 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

 

Tuesday, 6 April 2021

DIO BULDANA NEWS 6.4.2021

 


कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार

 - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे 

  • कोविड नियंत्रणावर लसीकरण हा प्रभावी उपाय
  • ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा
  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि 6 : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातही वाढीव दराने या औषधाची विक्री होत असल्यास धाडी टाकून तपासण्या कराव्यात, अशा सूचना  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आज दिल्या.

    कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  आदी उपस्थित होते.

    रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर लसीकरण अत्यंत प्रभावी असून लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा वेग बघता  लसींचा पर्याप्त साठा ठेवावा. त्यानुसार विभागाने नियोजन करावे. स्त्री रूग्णालयात नवीन 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयु युनीट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सीजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सीजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा.

     यावेळी  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझीटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

************

जिल्हयात ऑक्सीजन निर्मिती व रिफीलींग उद्योगासाठी पुढे यावे

  • अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
  • परवाना देण्यासाठी विभाग तत्पर

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यात एकुण ऑक्सीजनची मागणीनुसार पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे.

जिल्ह्यासाठी मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग,अकोला, मे. इसीस गॅसेस,जालना यांचेकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सदर पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाचया समन्वयाने काम करीत आहे.

        तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचे एकही उत्पादन व रिफीलर नाहीत जिल्ह्यात खाजगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा बाहेरुन जिल्ह्यामधून मागविण्यात येत आहे. कोव्हीड – 19 या विषाणुजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मेडीकल ऑक्सीजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सीजनची शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना गरज राहते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना सदर व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सीजन निर्मिती किंवा रिफीलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी  त्यांनी सदर कार्यालयातील सहायक आयुक्त औषधे अशोक बर्डे, औषध निरिक्षक गजानन प्रल्हाद घिरके, यांचेशी संपर्क साधावा.  जेणेकरुन असे व्यावसायीक पुढे आल्यास ऑक्सीजन उत्पादन, रिफीलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळणेसाठी त्वरीत मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे.  तसेच जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातुन समोर येवून सामाजिक हित जोपासावे असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*********

गहू व मका खरेदी करण्यासाठी 14 खरेदी केंद्रांना मान्यता

• खरेदी करताना कोरोना सुरक्षा विषयक नियम पाळावेत

• नोंदणी सुरू; 30 एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व मका आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू झाली असून येथे 30 एप्रिल 2021 पर्यंत विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. या खरेदी केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम 2020-21 मध्ये आधार भूत किंमत योजनेतंर्गत केंद्र शासनाचे वतीने मका प्रति क्विंटल 1850 रूपये, ज्वारी प्रति क्विंटल 2620 रूपये, गूह 1975 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

   नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधार लिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आदींसह संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून ऑनलाईन नोंदणी करावी.   कोविड रूग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळी केंद्रावर गर्दी करणे टाळावे, सॅनीटायर्झचा उपयोग करावा, तोंडावर मास्क वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबींचे पालन करावे. शेतकरी केंद्रावर नोंदणीसाठी अर्ज घेवून आल्यास सब एजंट संस्थांनी त्यांच्याकडून तात्काळ अर्ज घेवून शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, ओ जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.

ही आहेत खरेदी केंद्र : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, बुलडाणा, दे.राजा, मेहकर, लोणार, मलकापूर,  शेगांव, खामगांव, जळगाव जामोद व संग्रामपूर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दे. राजा केंद्र सिं. राजा, नांदुरा ॲग्रो  फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी.   

*****

 


Monday, 5 April 2021

DIO BULDANA NEWS 5.4.2021

 पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे  आयोजन

• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

• 7 एप्रिलपर्यंत चालणार मेळावे

बुलडाणा,(जिमाका)दि.5 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 5 ते 7 एप्रिल 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.rojgar. mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.

    या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 100 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

    रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

******

8 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 30 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर

• चिखली तालुक्यातील 17, बुलडाणा 4 व दे. राजा तालुक्यातील 4 गावांमधील कामे

बुलडाणा,(जिमाका)दि. 5 : जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, बुलडाणा, दे. राजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील देऊळगांव धनगर, कोनड खु, धोत्रा नाईक, अमोना, रोहडा, गुंजाळा, अंचरवाडी, काटोडा, एकलारा, किन्ही नाईक, सावरगांव डुकरे, खैरव, भालगांव या गावांमध्ये पाणी टंचाई नि‍वारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरखेड, दत्तापूर, लिंगा येथे नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. तसेच लोणार तालुक्यातील धायफळ, जाफ्राबाद, पार्डा दराडे, टिटवी, दे. राजा तालुक्यातील दे. मही, गिरोली खु, बोराखेडी बावरा, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी, अंभोडा, तराडखेड, मेहकर तालुक्यातील खानापूर, घाटबोरी, दादुलगव्हाण व गणपूर गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.

    त्याचप्रमाणे दे. राजा तालुक्यातील सेवानगर, सिं. राजा तालुक्यातील बुट्टा, चिखली तालुक्यातील पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, गांगलगाव, मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा, बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड गावामध्ये तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे.  मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.

*************

कोरोना अलर्ट : प्राप्त 2144 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 634 पॉझिटिव्ह

  • 932 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2778 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2144 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 634 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 500 व रॅपीड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 555 तर रॅपिड टेस्टमधील 1589 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2144 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :95, बुलडाणा तालुका : रायपूर 1, पांगरी 1, सव 1, ढालसावंगी 1, सुदंरखेड 2,      मोताळा शहर : , मोताळा तालुका : मुर्ती 1, धा. बढे 1, धोनखेडा 1, टेंभी 3,   खामगांव शहर :39 , खामगांव तालुका : सुटाळा 3, कोलोरी 1, आमसरी 1, नागापूर 1,   शेगांव शहर :5 , शेगांव तालुका : शिरसगांव निळे 1,     चिखली शहर : 31, चिखली तालुका : खैरव 1, अमडापूर 3, उंद्री 1, बेराळा 1, शेलगांव आटोळ 1, तेल्हारा 1, शेलोडी 1, अंचरवाडी 1, शेलसूर 2, बोरगांव काकडे 3, शेलूद 1, माळशेंबा 1,     मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका :  पिंपळखुटा 13,  दाताळा 1, भाडगणी 1, उमाळी 2,  दे. राजा शहर : 29, दे. राजा तालुका : उंबरखेड 1,  सिनगांव जहा 1, आळंद 1, कुंभारी 1, खैरव 1, डोढ्रा 1, दे. मही 5, सावखेड भोई 1,  चिंचोली 1, दगडवाडी 1, जुंबडा 2, अंढेरा 1,  गव्हाण 1,  दिग्रस 1, बायगांव 1, धोत्रा नंदई 1,

       सिं. राजा शहर :14, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, देवखेड 1, आगेफळ 1,  गोरेगांव 1, निमगांव वायाळ 7, देवखेड 1, दरेगांव 1, जांभोरा 3, वाघजई 1, महारखेड 2, खैरखेड 1,  सोयंदेव 1, उमरद 1,  साखरखेर्डा 15, नाव्हा 1, मलकापूर पांग्रा 2, आंबेवाडी 1, भोसा 1, शिंदी 2, गुंज 6, पांगरी काटे 1, शेंदुर्जन 4, खामगांव 1,     मेहकर शहर :47, मेहकर तालुका : उकळी 4, गांधारी 1, फर्दापूर 1, कळपविहीर 2,  साब्रा 1, हिवरा आश्रम 8, दे. माळी 3, बोरी 2,  वेणी 1, डोणगांव 5, सावरगांव 1, लव्हाळा 5, नागापूर 1,भालेगांव 1,लिंबी 3, मादनी 1,    संग्रामपूर शहर : 1, संग्रामपूर तालुका : बनोसा 1, खिरोडा 1, वानखेड 1, बेलोरा 1, पातुर्डा 8, टुनकी बु 3, काटेल 1, रिंगणवाडी 2, वरवट बकाल 1,

   जळगांव जामोद शहर :1,   नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : धानोरा 1, काटी 2, वडनेर 3, डिघी 1, वडनेर 55, सावंगा 1, अवधा 1, कोळंबा 1, पोटा 2, वडाळी 3,   लोणार शहर :16, लोणार तालुका : अंजनी 1, दे. कोळ 2, बिबी 4, मांडवा 5, महारचिकना 1,  खळेगांव 1, मातमळ 10, पिंपरखेड 2,  कऱ्हा 4, खुर्नाळा 1, गुंज 1, शिवणी 1, पाडोळी 1, चौंढी 1, सरस्वती 2, कारेगांव 1,  अजिसपूर 2, भुमराळा 1, किन्ही 7, पार्डा 1, उमरी 1,  किनगांव जट्टू 1,बोरी काकडे 8, धायफळ 4, खापरखेड 1, ब्राम्हणचिकना 1,  पिंपळनेर 1, बिबखेड 2, पांगरा 2, तांबोळा 1,  गणेशपूर 1, मांगवडी 1, हिरडव 1, भोटपूरी 2,       परजिल्हा जाळीचा देव ता. भोकरदन 1, अजिंठा 1, वडोदा पानाचे ता. मुक्ताईनगर 1, अकोला 1,  हिंगोली 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 634 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिं. राजा येथील 79 वर्षीय पुरूष, सावरगांव डुकरे ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील 68 वर्षीय पुरूष, चौथा ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला व मोताळा येथील 80 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 932  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 239452 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 35668 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  35668 आहे. 

  आज रोजी 2910 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 239452 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41704 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 35668 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5749 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 287 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

--