कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 09 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात आज प्राप्त 09 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 634 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे. सध्या रूग्णालयात एक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे. सदर रूग्ण जळगांव जामोद येथील 45 वर्षीय पुरूष आहे.
तसेच आज 12 मे रोजी 09 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 09 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 32 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 634 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
*****
दस्त नोंदणीकरीता मुद्रांक उपलब्ध
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दस्त नोंदणीकरीता 20 एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच अधिनस्त कार्यरत मुद्रांक विक्रेते यांचेकडून आवश्यक त्या प्रमाणात मुद्रांक विक्री सुद्धा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात मुद्रांकाचा साठा उपलब्ध असून कोणत्याही तालुक्यात मुद्राकांचा तुटवडा नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत दक्षता घेवून मुद्रांक विक्रेते यांचेकडे गर्दी होणार नाही, अशा प्रकारे शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन करून नागरीक मुद्रांक खरेदी करू शकतात. तरी सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुद्रांक विक्रेते यांना सहकार्य करावे. खरेदीचे ठिकाणी घाई करून गर्दीत वाढ होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एम. एस कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी व यात्रेकरूंना एसटी सोडणार मोफत
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : लॉकडाऊनमुळे राजयात अडकलेल्या मजूर, विस्थापित कामगार, यात्रेकरून, विद्यार्थी व इतर व्यक्तींना रात्यातंर्गत व परराज्यातून राज्यात येवू इच्छिणाऱ्या या सर्व व्यक्तींना काही अटी, शर्तींवर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यच्या सीमेपर्यंत इतर राज्यातून आलेल्या व राज्यातंर्गत असलेल्या नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत राज्य परिवहन महामंडळ एसटी बसमधून मोफत् पोहोचविणार आहे.
परराज्यातून राज्याच्या सीमेपर्यंत आलेल्या राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची यादी प्रमाणीत करून ती एस टी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यावी. राज्यातंर्गत अडकून असलेल्या मजूर, विस्थापित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी व इतर व्यक्तींना राज्यातील त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अडकलेल्या व मूळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींची यादी प्रमाणीत करून एसटीच्या आगार व्यवस्थापक अथवा अधिकाऱ्यांकडे द्यावी. अशी यादी उपलब्ध झाल्यानंतर आगार व्यवस्थापक एसटी बस उपलब्ध करून देणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
मनरेगा मजूरीचा दर 238 रूपये प्रतिदिन लागू
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या मजूरीचा नवीन 238 रूपये प्रतिदिन दर केंद्र शासनाने लागू केला आहे. तरी या योजनेवरील मजुरांना द्यावयाच्या अकुशल मजुरीचा दर 1 एप्रिल 2020 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. कुशल बाबीसाठी दर त्या- त्या खातयाच्या विहीत दरसुचीनुसार देण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेली व शेल्फवरील कामांची अंदाजपत्रके नवीन सुधारीत करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सुधारीत अंदाजपत्रकामुळे मजूरी अदा करण्यात विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment