वझर येथील बंधाऱ्यातील पक्ष भिंतीजवळील खडकांमधील
नैसर्गिक भेगांमधून झिरपा
- झिरपा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजूने नाल्यामध्ये,
- वझर येथील चारही बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा
बुलडाणा,
दि.20 - जलयुक्त शिवार अभियानातंर्गत खामगांव तालुक्यातील वझर येथील पश्चिमेकडील
नाल्यावर क्रमांक 1 व 2 बंधारा निर्माण करण्यात आला आहे. तर बोर्डी नदीवर क्रमांक
3 व 4 बंधाऱ्याचे बांधकाम झालेले आहे. अशाप्रकारे एकूण चार बंधारे वझर शिवारात
आहे. या चार बंधाऱ्यापैकी क्रमांक 1,2 व 3 चे बांधकाम मार्च 2016 मध्ये आणि बंधारा
क्रमांक 4 चे काम नोव्हेंबर 2016 मध्ये पूर्ण झालेले आहे. या सिमेंट नाला
बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आलेला आहे. येथील
बंधाऱ्यांची कामे गुणनियंत्रण यंत्रणेकडून झालेल्या संधानकाचे कामाचे चाचणी अहवाल
प्राप्त आहेत. जिगांव उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली असता बंधाऱ्यांच्या
भिंतीमधून कुठल्याही प्रकारचा झिरपा येत नसल्याचे निदर्शनास आले. मात्र नाल्यातील
झिरपा हा पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजुने कठीण खडकाला असलेल्या नैसर्गिक भेगांमधून होत
असल्याचे निदर्शनास आले आहे.
पक्ष भिंतीच्या बाहेरील बाजुने पाणी झिरपून नाल्यामध्ये
येत असून त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सदर झिरपा होणे हे नैसर्गिक आहे. बंधाऱ्याचे झालेल्या
बांधकामातून कोठेही पाण्याचा झिरपा होत नाही. येथे दोन बंधाऱ्याच्या डाव्या
बाजुच्या पक्ष भितीच्या बाहेरून होणारा पाण्याचा झिरपा बंद करण्यासाठी मातीचा
पुर्नभराव करून घेण्यात येणार आहे. मात्र हा झिरपा खडकातून नैसर्गिकरित्या होत
असल्यामुळे भविष्यात हा झिरपा बंद होईलच याची खात्री नाही. सदर खात्यामार्फत करण्यात
आलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाच्या भिंतीमधून व बांधकामाच्या पायातून झिरपा नाही. त्यामुळे
जलयुक्त शिवार योजनेला कीड.. वझर येथील चारही सिमेंट बांध झिरपू लागले.. या तक्रारीत
बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे व पाण्याचा झिरपा बंधाऱ्याच्या
बांधकामातून होत आहे. असे नमूद आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नसून तक्रारीत तथ्य
नाही, असा खुलासा कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांनी
प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.
********
सिंदखेड राजा येथे महिला लोकशाही दिनाचे 27 नोव्हेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि.20 : तहसिल कार्यालयात
प्रत्येक महिन्याच्या चवथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सिंदखेड
राजा तहसिल कार्यालयात या महिन्यात या महिन्याचा महिला तालुकास्तरीय लोकशाही
दिनाचे आयोजन सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.
विहित
नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी
पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित
रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. अर्जदाराने
एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला
जाणार नाही.
तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/
अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित
नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध
न्यायालयात, प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त
यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक
कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे तहसलीदार यांनी कळविले आहे.
****
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर
- 24 नोव्हेंबर पर्यंज अर्ज स्वीकारणार
- युवकांनी स्वयंरोजगारासाठी योजनेचा लाभ घ्यावा
बुलडाणा,
दि.20 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन 2017-18 आर्थिक वर्षाकरीता उद्दिष्ट
प्राप्त झाले आहे. सदर उद्दिष्ट
व्यावसायिक प्रशिक्षण योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व
नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज आमंत्रित
करण्यात आले आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 6 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय,
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलडाणा
यांच्याकडे सादर करावीत.
अनुसूचित जाती व
नवबौद्ध संवर्गातील पात्र व इच्छूक उमेदवारांची निवड व्यवसाय प्रशिक्षण योजनेतंर्गत
करण्यात येणार आहे. या
योजनेसाठी मात्र मातंग व चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये
येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी पात्र असणार नाही. योजनेसाठी अर्जदार हा जिल्ह्याचा रहीवासी असावा,
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा तहसिलदाराचा दाखला, रेशन कार्ड, मतदान
ओळखपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सादर
करावे. तरी गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन
जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर यांनी
केले आहे.
********
विधी सेवा
प्राधिकरणाच्यावतीने अपंग शाळेत बालक दिन साजरा
बुलडाणा,
दि.20 - स्थानिक अपंग विद्यालयात 14 नोव्हेंबर रेाजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वकील
संघ बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने बालक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शिबिर
घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा संघाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती
सुरेखा कोसमकर, सचिव शैलेश बाफना उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक
साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अपंग विद्यार्थ्यांनी
स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपंग शाळेचे संचालक डॉ.
गुप्ता, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड देवकर, सचिव ॲड दाभाडे, विक्रांत मारोडकर, अधिक्षक
डी. सी तोमर, कर्मचारी एस.एस अवचार, आर.
आर इंगळे, एम. एम भारसाकळे, एस. एन मुळे, एच.ए देशमुख व अपंग शाळेचे कर्मचारी
यांनी प्रयत्न केले.
***
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे
मासिक नियतन जाहीर
* 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत करावी लागणार धान्याची
उचल
बुलडाणा, दि 20 - राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांकरिता
माहे सप्टेंबर 2017 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.
या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि,
टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत धान्याची उचल
करावी लागणार आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक
खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू
4951 क्विंटल व तांदूळ 3309, चिखली गहू 4086 व तांदुळ 2724, अमडापूर
गहू 1264 व तांदूळ 843, दे.राजा गहू 2167 व तांदूळ 1445, मेहकर गहू 3785 व तांदूळ 2523, डोणगांव गहू 1205
व तांदूळ 803, लोणार गहू 2403
व तांदूळ 1602, सिं.राजा गहू 1957 व तांदूळ 1305, साखरखेर्डा गहू 1276
व तांदूळ 851, मलकापूर गहू 3007 व तांदूळ 2005, मोताळा गहू 2947 व तांदूळ 1964, नांदूरा गहू 2891 व तांदूळ 1927,
खामगांव गहू 5796 व तांदूळ 3864, शेगांव गहू 2644
व तांदूळ 1762, जळगांव जामोद गहू 2687 व तांदूळ 1791, संग्रामपूर गहू 2314 व तांदूळ 1542 क्विंटल आहे.
अशाप्रकारे गहू 45 हजार 380 व तांदूळ 30 हजार 260
क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
****
विद्यार्थ्यांच्या भोजन, निवासाचा
खर्च शासन उचलणार
·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
·
31 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत
·
वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्चाची
रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात
·
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असणारे बँक खाते
आवश्यक
बुलडाणा, दि. 20 :
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता
यावे म्हणून भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून
घ्याव्या लागतात. महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून
तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात
मर्यादा येतात. त्यसाठी राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या
विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत
अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय
वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी
त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या
बँक खात्यात रक्कम जमा करण्यात
येणार आहे. योजनेच्या लाभासाठी अर्ज 31 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
वसतिगृहात प्रवेश मिळालेला
नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक
सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार
आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. या
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका
परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच
प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे.
या योजनेच्या निकष, अटी अर्ज www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्ज डाऊनलोड करून भरावे लागणार
आहे किंवा सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांस उपलब्ध
होणार आहे. जिल्हानिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात
विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास
गुणवत्तेवर निवड करण्यात येणार आहे. निवड यादी समाज कल्याण कार्यालयामार्फत
प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात
येणार नाही. या योजनेच्या अर्ज स्वीकारण्यास
मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास
सादर करावे लागणार आहे. अर्ज डाकेने, समक्ष किंवा swadhar.swbuldhana@gmail.com या
ईमेल आयडीवर पाठवावे. यासाठी पात्र
असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment