मुख आरोग्य हे शारिरीक स्वास्थ्याचे गमक
- जिल्हाधिकारी
* मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन
* 31 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार मोहिम
बुलडाणा, दि. 2 : मुख आरोग्य सांभाळले पाहिजे. मुख स्वास्थ्य हे पुष्कळच्या
आजारांपासून आपले संरक्षण करते. अनेक आजार मुख दुर्गंधी असल्यामुळे निर्माण होतात.
अशा आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख आरोग्य महत्वाचे आहे. स्वच्छ श्वास हे
स्वच्छ शरीराचे प्रतिक आहे. त्यामुळे मुख
आरोग्य हे चांगल्या शरीर स्वास्थ्याचे गमक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.
चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. मुख स्वास्थ्य तपासणी मोहिमेचचा उद्घाटनीय
कार्यक्रम जिल्हा सामान्य रूग्णालय येथे नुकताच पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन
करताना बोलत होते.
यावेळी
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील होत्या, तर जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. शिवाजी पवार, आयएएम चे अध्यक्ष डॉ. राठोड, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
भागवत भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, आरसीएच डॉ. गोफणे, नोडल
अधिकारी डॉ. शैलेश वैष्णव, जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, डॉ. आशिष गायकवाड, सी.
टी इंगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.
मिलींद जाधव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 31 डिसेंबर
2017 पर्यंत मुख आरोग्य मोहिम चालणार असून यामध्ये विविध दिवशी कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व
शासकीय, निमशासकीय, कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तंबाखु विषयी
जनजागृती व समुपदेशन करण्यात येईल.
कार्यक्रमाला डॉ.
महेश बाहेकर, प्रा. श्री. पठाण, रामेश्वर बांबल, प्रा. राजेंद्र कंदारकर, रणजित
राजपूत, श्रीमती पिसे, प्राचार्या श्रीमती खेडेकर, श्रीमती शेळके, शारदा गाडेकर, सुनील
राजस, मलीक खान, श्रीमती किर्ती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.
लता भोसले यांनी तर संचलन डॉ. आशिष गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन समुपदेशक
सिद्धार्थ जाधव यांनी केले.
*******
एड्स आजाराविषयी रॅलीमधून जनजागृती
एड्स आजाराविषयी रॅलीमधून जनजागृती
बुलडाणा, दि. 2 : जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने
आज 2 डिसेंबर रोजी एडस आजाराविषयी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या
प्रांगणातून जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते हिरवी झेंडी
दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माझे आरोग्य माझा अधिकार याविषयी शपथही देण्यात
आली.
यावेळी जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. सरीता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपविभागीय
पोलीस अधिकारी श्री. महामुनी, नगरपालिकेचे श्री. सौभागे, शाहीर डी. आर इंगळे आदी
उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये
उपस्थित होते. एड्स आजारा विषयी जनजागृती या रॅलीमधून करण्यात आली.
*******
कांदा
उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान उपलब्ध
·
100 रूपये प्रति क्विंटल अनुदानाची रक्कम
·
मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा
विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान
बुलडाणा, दि. 2 : ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील कांदा कृषि
उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे माहे जुलै व
ऑगस्ट 2016 मध्ये विक्री केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 100 रूपये अनुदान
शासनाने मंजूर केलेले आहे. त्यानुसार 1866 लाभार्थी शेतकऱ्यांचे 19 लक्ष 87 हजार
389 रूपये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कृषि
उत्पन्न बाजार समिती यांचेकडून ज्या लाभार्थीचे बँक खाते क्रमांक प्राप्त झालेले
आहेत, अशा लाभार्थींचे बँक खात्यामध्ये कांदा अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली
आहे.
मात्र अद्याप 622
लाभार्थीचे त्यांचे बँक खाते क्रमांक संबधित माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीकडे जमा
केली नाही. त्यामुळे त्यांचे कांदा अनुदानाची रक्कम त्यांचे खात्यावर जमा करणे
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला शक्य नाही. तरी सर्व कांदा अनुदान पात्र लाभार्थी
यांनी 8 दिवसांमध्ये त्यांचे बँक खाते क्रमांक कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व
नांदुरा यांचेकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी
केले आहे.
******
सोयाबीन
उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान प्राप्त
·
शेतकऱ्यांच्या याद्या बँकाकडे सादर
बुलडाणा, दि. 2 : ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी माहे ऑक्टोंब, नोव्हेंबर व डिसेंबर 2016 मध्ये कृषि उत्पन्न बाजार
समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रूपये
अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे
सोयाबीन अनुदानाबाबत याद्या संबंधित बँकाकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा जमा
करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर याद्या संबंधित बाजार समितीचे
कार्यालयात जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी जाहीर प्रसिद्ध कराव्यात,
असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
*********
राहेरा गावाच्या पुनर्वसनासाठी 5 डिसेंबर रोजी भूखंड वाटप
बुलडाणा, दि. 2 : राहेरा संग्राहक लघु पाटबंधारे योजना मोताळा तालुक्यात
करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राहेरा गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यानुसार
या प्रकल्पातंर्गत राहेरा गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यामुळे नवीन गावठाण येथे
भूखंड वाटप करण्यात येणार आहे. हे भूखंड मंगळवार, दि. 5 डिसेंबर 2017 रोजी सकाळी
11 वाजता राहेरा येथे करण्यात येत आहे. तरी या कार्यवाहीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित
रहावे व पुढील कार्यवाही पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी
अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
*****
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 2 : राज्याचे पाणीपुरवठा व स्व्च्छता
मंत्री दि. 3 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 3 डिसेंबर रेाजी
दुपारी 2 वाजता मौजे डिकसळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथून दुसरबीड ता. सिं.
राजाकडे प्रयाण, सायं 6.35 वाजता दुसरबीड येथे आगमन व श्री मुरलीधर डोईफोडे यांचे
चिरंजीव यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती, सोयीनुसार दुसरबीड येथून जालनाकडे
प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment