· *नांदुरा येथे 17 डिसेंबर रोजी
कार्यक्रमाचे आयोजन
· * बळीराजा जलसंजीवनी योजना
बुलडाणा, दि. 14: राज्यात निधीअभावी रखडलेल्या 21 मुख्य व 83 लघु
अशा एकूण 104 प्रकल्पांची कामे आता शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत पुर्ण होणार
आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील प्रकल्पांचा
यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये विदर्भातील रखडलेल्या 81 प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेतंर्गत जिल्हयातील जिगांवसह 8 लघु प्रकल्पांसाठी
अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कार्यान्वितीकरण अर्थातच कार्यान्वयन कामाचा शुभारंभ
17 डिसेंबर 2017 रोजी नांदुरा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन 17 डिसेंबर 2017
रोजी सकाळी 11 वाजता कोठारी विद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे. प्रकल्पांचे कार्यान्वीतीकरण
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, जलसंधारण आणि गंगा शुद्धीकरण विभागाचे मंत्री नितीन गडकरी
असणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृह
राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील राहणार आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणारआहे
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पुर्ण
करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुर केलेल्या अर्थसहाय्या अंतर्गत जिगांवसह अन्य 8 लघु प्रकल्पांची कामे पुर्ण होणार
आहे. यामध्ये आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे ता. संग्रामपूर, चोंढी बृहत लघु पाटबंधारे
ता. संग्रामपूर, अरकचेरी बृहत लघु पाटबंधारे योजला ता. संग्रामपूर, निम्न ज्ञानगंगा
2 बृहत लघु पाटबंधारे योजना ता. खमगांव, दुर्गबोरी लघु पाटबंधारे योजना ता. मेहकर,
दिग्रस कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा ता. दे.राजा, बोरखेडी मिश्र संग्राहक तलाव ता. लोणार
आणि राहेरा संग्राहक तलाव ता. मोताळा यांचा समावेश आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील समाविष्ट्र
सिंचन प्रकल्प पूणर् झाल्यानंतर सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे, असे
सचिव यु.पी सिंग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव अ.वा सुर्वे, प्रधान सचिव
आय.एस चहल, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता रविंद्र लांडेकर, बुलडाणा अधिक्षक अभियंता
नितीन सुपेकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment