Wednesday, 12 April 2017

news 12.4.2017 dio buldana

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 12 :  जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर गुरूवार, दि. 13 एप्रिल 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 13 एप्रिल 2017 रोजी सकाळी 5.28 वाजता शेगांव येथे आगमन व मोटारीने खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.
                                                                        ***
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबिर
बुलडाणा दि‍. 12- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे संयुक्त विद्यमाने 11 एप्रिल 2017 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त संकलन केंद्रात घेण्यात आले.
  शिबिरात ए.जे हिवाळे, राम तोंडीलायता, विजय जाधव आदी उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील जी.बी धोटे, पी.एम धर्माधिकारी, इ. आर देशमुख तसेच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य एम. व्ही अवचार, प्रा. गायकवाड, प्रा. साखरे, प्रा. बोकाडे, प्रा. डॉ इंगळे, प्रा. गेडाम, प्रा. मोठे, प्रा. ठोंबरे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून कार्यक्रम पार पडला.
******
जात प्रमाणपत्र पडताळणी करताना मध्यस्थांपासून सावध रहावे
·        जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन
बुलडाणा,दि‍.12- जातीचे प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी आणि वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रकरणे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येतात. खोटी माहिती सादर करणे, खेटे विधान किंवा खोटे दस्ताऐवज दाखल करणे, अन्य कोणत्याही प्रकारच्या लबाडीने जातीचे  व त्याच्या वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळविणे, मागासवर्गीय नसतांना अशा प्रमाणपत्राचा लाभ घेणे, नोकरी व शिक्षण घेण्यासाठी, निर्वाचन पदावर निवडून येण्यासाठी वापर करणे हा दंडनीय अपराध आहे. असा अपराध दखलपात्र व अजमानती आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करताना कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थ व दलालांपासून सावध रहावे, आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
   तरी उक्त प्रकरणांमध्ये जातीचे प्रमाणपत्र रद्द करणे, जप्त करणे यापुरतीच ही कार्यवाही मर्यादीत नसून कायद्यान्वये अशा अपराधी व्यक्तीला दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 20 हजार रूपयांपर्यंत द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर अशा प्रकारचा गुन्हा हा भारतीय दंड विधानातंर्गतदेखील शिक्षेस पात्र ठरणार आहे. तसेच अशा अपराधासाठी कटकारस्थान करणाऱ्या अथवा गैरकृत्य / गुन्ह्याला प्रोत्साहन किंवा साथ देणाऱ्या व्यक्तीलासुद्धा सदर दोन्ही कायद्याच्या विविध तरतूदी लागू होतात. फेर फार केलेल्या दस्ताऐवजांची, खोटे तयार केलेल्या दस्तादेवजाची शास्त्रीय पद्धतीने तपासणीसाठी सध्या खूप तंत्रज्ञान उपलब्ध आहे. असा दस्ताऐवज अर्जासोबत दाखल केल्यास संबंधित गुन्हेगारांविरूद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आवाहनही करण्यात आले.
 जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व त्याच्या पडताळणीकरीता लोकसेवकांकडून पैशाची मागणी होत असेल. त्यासाठी अडवणूक करणे, दिरंगाई करणे असे आढळून येत असेल, तर अशा लोकसेवकांविरूद्ध संबंधित जिल्ह्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.
***
   कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत 15 व 16 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 12 :  कृषि, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत 15 व 16 एप्रिल 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 15 एप्रिल 2017 रोजी दु 4.45 वाजता मालेगांव जि. वाशिम येथून डोणगांव ता. मेहकरकडे प्रयाण, सायं 6 वाजता डोणगांव येथे आगमन व शेतकरी मेळाव्याला उपस्थिती, रात्री 8 वाजता डोणगांव शेतकरी उत्पादक कंपनीची भेट व चर्चा, रात्री 9 वाजता डोणगांव येथून शासकीय मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10.30 वाजता बुलडाणा विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, दि. 16 एप्रिल 2017 रोजी सकाळी 8.15 वाजता विश्रामगृह येथून सुंदरखेडकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता सुंदरखेड येथे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत उभारलेल्या महेंद्र जतकर यांचे शेडनेट हाऊसची पाहणी व चर्चा, सकाळी 8.50 वाजता सावळाकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता सावळा येथे आगमन, 9 ते 11 वाजेदरम्यान सावळा येथे मागेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळ्यांचे भूमीपुजन, पूर्ण झालेल्या शेततळ्याची पाहणी, पाणी पुरवठा योजनेतंर्गत कामाचे भूमीपुजन, जलसंधारण कार्यक्रमातंर्गत विविध कामांचे भूमीपुजन व लोकार्पण, शेतकऱ्यांशी संवाद, सकाळी 11 वाजता सव ता. बुलडाणाकडे प्रयाण, 11.30 वाजता सव येथे आगमन व 12.30 वाजेपर्यंत सव येथे पांडुरंग शेळके यांचे शेतावर सामुहिक शेततलाव व रोहयो अंतर्गत आवळा फळबागेची पाहणी, मृद आरोग्य पत्रिका, यांत्रिकीकरण/राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानतंर्गत अवजारे व अनुदान वितरण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता सव येथे कृषि, फलोत्पादन, पणन,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
   दुपारी 2 वाजता सव येथून चिखलीकडे प्रयाण, दु 2.30 वाजता चिखली विश्रामगृह येथे आगमन व शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राखीव वेळ, दु 3.30 वाजता हातणी ता. चिखलीकडे प्रयाण, दु 3.45 वाजता हातणी येथे आगमन व श्रमदानातून शौचालयाची उभारणी कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशनची जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती, सायं 6 वाजता हातणी येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 6.30 वाजता बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, रात्री 7.30 विश्रामगृह राखीव, रात्री 8 वाजता बुलडाणा येथून वाघजाळ फाटाकडे प्रयाण, रात्री 8.15 वाघजाळ फाटा येथे आगमन व शेतकऱ्यांशी चर्चा, रात्री 8.30 वाजता वाघजाळ फाटा येथून मलकापूरकडे प्रयाण, रात्री 9.25 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व 9.40 वाजता मलकापूर येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                                    ******
 निलक्रांती योजनेतंर्गत एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन
बुलडाणा, दि. 12 :  केंद्र शासनाचे निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांसाठी आणि मत्स्योद्योजकाकरीता तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन 18 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजता बसथानकासमोर, प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले आहे.

   या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय, मत्स्योत्पादन दुपटीने वाढविणे, निलक्रांती योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेकरीता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांनी तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांनी, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त्‍ मत्स्यव्यवसाय स.ई नायकवडी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment