जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा
फुले यांना अभिवादन
बुलडाणा दि. 11- जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी
उपस्थित सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनीही महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन
अधिकारी दिपक सिडाम, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुनर्वसन
अधिकारी श्री. खांदे, तहसीलदार श्री. काळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
******
परिवहन कार्यालयाची तब्बल 111.72 टक्के
महसूल वसूली
- 40 कोटी उद्दिष्टापेक्षा
44.97 कोटी रूपयांच्या महसूलाची वसूली
- 73 चालक परवान्यावर
निलंबनाची कार्यवाही
- जिल्ह्यात 36 हजार 118
नवीन वाहनांची नोंदणी
- 45 हजार 117 नवीन चालक
परवाने
बुलडाणा, दि. 11 :- सन 2016-17 या
आर्थकि वर्षात बुलडाणा परिवहन कार्यालयाने धडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या
उद्दिष्टापैकी तब्बल 111.72 टक्के वसूली केली आहे. त्यामुळे शासनाला कोट्यवधींचा
महसूल मिळाला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा यांना शासनाने गत आर्थिक
वर्षात 40.25 कोटी महसूल उद्दिष्ट दिले होते. त्यातुलनेत विभागाने 44.97 कोटी
म्हणजेच 111.72 टक्के महसूलाची वसूली केली आहे.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण 36 हजार 118 नविन वाहनांची
नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 31 हजार 279 दुचाकी, 1828 चारचाकी कार व जिप, 12
ऑटोरीक्षा, 181 ट्रक, 1112 डिलीव्हरी व्हॅन्स, 1684 ट्रॅक्टर व 819 प्रवासी
वाहनांचा समावेश आहे. तसेच या वर्षात 45 हजार 117 नविन ड्रायव्हींग लायसन्स, 1852 नविन वाहक परवाना परिवहन विभागाने जारी
केले आहे.
जिल्ह्याकरिता एक वायुवेग पथक मंजूर करण्यात आले असून सन 2016-17 मध्ये
जिल्ह्यातील एकूण 3483 वाहनांविरूद्ध धोकादायकरित्या वाहन चालविणे, हेल्मेट न
वापरणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, ओव्हरलोड
वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विना परवाना वाहन चालविणे, कराचा भरणा न
करणे आदी विविध गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येवून 1 कोटी 41 लाख 65 हजार एवढा
दंड वसूल करण्यात आला. तसेच 1 कोटी 42 लाख
72 हजार इतकी कर वसूली करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 73 व्यक्तींच्या
चालक परवानावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक आदी परवाना धारक वाहन मालकांकडून या वर्षात 79
लक्ष 25 हजार 83 रूपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या
सामुहिक सहभागातून व प्रयत्नांमधून कार्यालयाने उद्दिष्टपूर्तीपेक्षा जास्त महसूल
वसूली साध्य केली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना
गायकवाड यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment