बांधकाम सुरू असलेल्या मालकांनी विना रॉयल्टीची रेती
घेवू नये
·
जिल्हाधिकारी
यांचे आवाहन
बुलडाणा, दि.28 - बांधकाम सुरू असलेल्या
घर मालकांनी रॉयल्टी नसलेली रेती घेवू नये. रॉयल्टीची तपासणी महसूल यंत्रणेच्या
संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी, तलाठी यांच्याकडून करावी. अशाप्रकारे रेती खरेदी
थांबल्यास चोरीची रेती विक्री करणाऱ्यांची धाडस वाढणार नाही. त्यासाठी बांधकाम सुरू
असलेल्या मालकांनी रॉयल्टीची रेती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे
यांनी केले आहे.
तहसीलदार यांनी बांधकाम सुरू असलेल्या स्थळी
भेट देवून मालकाकडून रेती रॉयल्टीची घेत असल्याची खातरजमा करावी अन्यथा रेती जप्त
करावी. रेती घाटांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सीसीटीव्हीचे एक महिन्याचे
फुटेज सांभाळून ठेवावे. या फुटेजमध्ये रेतीची चोरी करीत असल्याचे आढळल्यास त्या
इसमावर एफआयआर दाखल करावा. पोलीसांनी चोरीची रेती वाहतूक करणारी वाहने पकडून
पेालीस स्टेशनला जमा करावे. वाहन आरटीओ यांच्या
ताब्यात द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*******
अपंगांच्या तीन
टक्के निधीतून अनुदान योजनेचा लाभ घ्यावा
·
15
जानेवारी 2016 पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा, दि.28 - जिल्हा परिषदेच्या समजा
कल्याण विभागातंर्गत सन 2016-17 करीता अपंगांकरिता राखीव असलेल्या अपंग तीन टक्के
निधीतून अपंग लाभार्थ्यांकरिता 100 टक्के अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखनू ठेवलेल्या तीन टक्के
अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावयाचे आहे.
अपंग लाभार्थ्यांनी 24 नोव्हेंबर
2015 च्या शासन निर्णयातील केवळ ब मध्ये नमूद करण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाचे साहित्याची
मागणी करून परिपूर्ण अर्ज आवश्यक प्रमाणपत्रासह (बँक पासबुक व आधारकार्ड
छायाप्रतीसह) 15 जानेवारी 2017 पर्यंत पंचायत समिती स्तरावर सादर करावे. अर्ज सादर
करताना परीपुर्ण आवश्यक प्रमाणपत्रासह व विहीत मुदतीत सादर करावे. सदर योजनेचा
जिल्ह्यातील सर्व अपंग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प समाज कल्याण
सभापती गणेश बस्सी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
******
डाळींब निर्यातीसाठी अनारनेट प्रणालीवर
नोंदणी करावी
·
31
जानेवारी 2017 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि.28- महाराष्ट्र राज्य
युरोपीयन युनियनला व अन्य देशांना ताजी फळे निर्यातीत आघाडीवर आहे. निर्यातीकरीता प्रामुख्याने
किडनाशक उर्वरित अंश व किड रोग मुक्त उत्पादनाची हमी देणे आवश्यक असते. अपेडा व कृषि
विभागाच्या समन्वयाने राज्यात रेसिड्यु मॉनीटरींग प्लॅनची अंमलबजावणी करण्यात येत
आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी, त्याची तपासणी तसेच शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करणे आदी कामे कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्याचा समावेश अनारनेट अंतर्गत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच
तालुक्यामध्ये डाळींब या फळपिकाची लागवड केली आहे. या कार्यक्रमातंर्गत बागांची
तपासणी करून नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून देण्यात
येणार आहे. अनारनेट प्रणालीवर नोंदणी किंवा नुतनीकरण करावयाची अंतिम मुदत 31
जानेवारी 2017 पर्यंत आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधीत
तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी
केले आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळात कर्ज मागणी
अर्ज सादर करावे
·
जिल्हा
कार्यालयाला 424 अनुदान योजनेचे उद्दिष्ट प्राप्त
बुलडाणा, दि.28 - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा
कार्यालयाला चालु
आर्थिक वर्षात अनुदान 424 व बिज भांडवल योजनेतंर्गत 127 उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षीत व बेरोजगार, मातंग समाजातील 10 पोट जातीतील लोकांसाठी राष्ट्रीयकृत
बँकेद्वारा महामंडळामार्फत व्यवसाय करण्यास कर्ज उपलब्ध करून देते. तरी गरजू व
होतकरू लोकांनी 31 जानेवारी 2017 पर्यंत जिल्हा कार्यालयात येवून कर्ज मागणी अर्ज घेवून
जावे. याबाबत इच्छूक लोकांनी अर्ज घेवून जावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा
व्यवस्थापक यांनी केले आहे.
******
न्यायालयाने जामीनावर सोडलेले आरोपी फरार
बुलडाणा, दि.28 - न्यायालयाने जामीनावर
सोडलेले आरोपी सुखलाल उर्फ सिकलाल मोतीराम पवार, रा. सुकळी, ता. मेहकर आणि बाळ्या काळूराम भोसले रा. सवना,
ता. सेनगांव, जि. हिंगोली फरार आहेत. त्यांचा निश्चित ठावठिकाणा मिळून येत नाही.
तरी छायाचित्रात फरार आरोपी मिळून आल्यास संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी,
असे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, मंठा, जि. जालना यांनी कळविले आहे.
******
1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा
बुलडाणा, दि.28 – मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी
व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्यातील केंद्र
शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, मंडळे, राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय
कार्यालये, महामंडळ, खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठ,
महाविद्यालये आदी ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.
तरी मराठी भाषा संवर्धनाबाबत विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार करून हा
पंधरवडा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
*****
रोख रहित प्रशिक्षणाचे आज आयोजन
बुलडाणा दि 28- शासनाने रोख रहीत व्यवहार प्रत्येक क्षेत्रात
वाढविण्यासाठी कार्य सुरू केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवहार हा कॅशलेस
होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर योजनाही सुरू केल्या
आहेत. या रोखरहीत व्यवहारांसंदर्भात प्रशिक्षण आहरण व
सवितरण अधिकारी यांच्यासाठी उद्या 29 डिसेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षण जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवन, येथे
29 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजता
होणार आहे. तरी सदर्हु प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी
उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मिनाक्षी आर. पवार यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment