जिल्ह्यातील
1551 पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
·
जिल्हास्तरीय समितीकडून 2 कोटी 90 लक्ष रूपयांच्या
प्रस्तावांना मान्यता
·
755 शेतकऱ्यांना गहाण वस्तु परत मिळाल्या
बुलडाणा, दि 26 - शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान
उभे ठाकले आहे. हवामान बदलामुळे पीक पद्धतीत बदल करून हवामानाशी सुसंगत पीक
घेण्यासाठी शेतकरी सज्ज आहे. मात्र कर्ज
हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न असून कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस येत असल्याचा
अनुभव आहे. शासनाने विदर्भ व
मराठवाड्यामधील परवानाधारक सावकारांचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह
कर्जमाफी दिली आहे. या दिलासा देणाऱ्या निर्णयामुळे निश्चितच जिल्ह्यातील
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरोखरच शासनाने दिलेली कर्जमाफी
ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वचनपूर्ती ठरली आहे.
शासनाने परवानाधारक सावकारांकडील
विदर्भ व
मराठवाड्यातील
शेतकऱ्यांनी काढलेले
कर्ज माफ
करण्याचा निर्णय
घेतला होता.
त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक
50 सावकारांकडून कर्ज
घेतलेल्या 1551 पात्र
कर्जदार शेतकऱ्यांचे
कर्ज व त्यावरील
व्याज शासनाने
माफ केले
आहे. जिल्हास्तरीय समितीने 2 कोटी
90 लक्ष रूपयांचे प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुद्दल 2 कोटी 48
लक्ष आणि 42 लक्ष रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 36 सावकारांकडील
755 कर्जदार शेतकऱ्यांपोटी 1 कोटी 80 लक्ष रूपयांची रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम
परवानाधारक सावकारांना शासन कर्जाची व व्याजाची रक्कम
अदा करणार असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके होण्यास
मदत मिळणार आहे.
या योजनेनुसार
30 नोव्हेंबर 2014
रोजी परवानाधारक सावकाराकडून
येणे असलेले
व आजमितीस
परत फेड
न केलेली
कर्ज, त्यावरील
व्याजासह शासनाने
माफ केले
आहे. या
कर्जमाफीसाठी कर्जदार
हा शेतकरी
अथवा शेतकरी
कुटूंबातील असावा,
परवानाधारक सावकाराच्या
कार्यक्षेत्रातील रहीवासी
व शेती
असणारा असावा. नोकरदार,
निवृत्ती वेतन
धारक, दुकान
व आस्थापना
अधिनियमनातंर्गत परवानाधारक
या कर्ज
माफीसाठी अपात्र
आहेत.
जिल्ह्यात परवानाधारक
सावकारांची संख्या
30 नोव्हेंबर 2014
रोजी 158 होती.
त्यापैकी या
योजनेतंर्गत शेतकरी
कर्जदारांचे कर्ज माफ
करण्यासाठी तालुका
स्तरीय समितीने
छाननी करून 1551
कर्जदार शेतकऱ्यांचे
प्रस्ताव पाठविले आहेत. त्यापैकी 755 शेतकऱ्यांना मुद्दल
व व्याज,
असे 1 कोटी 80 लक्ष रूपयांचे
प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची
कार्यवाही सुरू आहे. कर्ज व व्याज माफीसोबतच शासनाने सावकारांकडे गहाण ठेवलेल्या
वस्तु शेतकऱ्यांना परत देण्याची कार्यवाहीसुद्धा केली आहे. आतापर्यंत 755
शेतकऱ्यांना सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तु मिळाल्या आहेत.
जिल्हाधिकारी
यांनी या
योजनेतंर्गत ज्या
शेतकऱ्यांचे कर्ज
माफ करण्यात
आले आहे.
त्यांच्या सावकाराकडील
तारण वस्तू
7 दिवसांच्या आत
शेतकऱ्यांना परत
करून देण्याची
कार्यवाही करण्याच्या व
या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे
प्रमाणपत्र देण्याच्या
सूचना दिल्या आहेत.
सध्या जिल्ह्यातील परवानाधारक
सावकारांचे 12 हजार 93
कर्जदार शेतकऱ्यांच्या
13.40 कोटी रूपये कर्जाच्या
याद्या तालुका
स्तरीय समितीकडे
प्राप्त झाल्या
आहेत. या
याद्या शासन निर्णयातील
तरतूदीनुसार तापासणी
करून घेण्याची
कार्यवाही करण्यात
येत आहे.
कर्जमाफी करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू असल्यामुळे शेतकरी पुढील हंगामाला
आशेने सामोरे जात आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे राज्य सरकार
बळीराजाला सुखी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. हा याच प्रयत्नांचा भाग आहे.
कर्ज माफी
दिलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे.
यामुळे शेतकऱ्याला सदर सावकार पुढे कर्ज वसूलीचा तगादाही लावणार नाही. सावकारांचे
कर्ज माफ होत असल्यामुळे शासनाचे शतश: आभार जिल्ह्यातील शेतकरी मानत आहे.
शेतकऱ्यांचे सावकारांकडील कर्ज माफ झाल्यामुळे नव्या उमेदीने शेतकरी सज्ज झाला
आहे. एवढे मात्र निश्चित.
****
नगर परिषद निवडणूकीची प्रारूप
मतदार यादी प्रसिद्ध
- 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती, सूचना दाखल
कराव्यात
बुलडाणा, दि. 26 - राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे
नगर परिषद निवडणूक -2016 करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी नगर
परिषद बुलडाणा, चिखली, दे.राजा, मेहकर, खामगांव, शेगांव, जळगाव जामोद, नांदुरा व
मलकापूर येथील मतदारांची आहे. यादी संबंधित नगर पालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आली
आहे. तरी या नगर परिषदांमधील रहिवाशांनी प्रारूप मतदार यादीवर काही हरकती व सूचना
असल्यास संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांचेकडे 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत
कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले
आहे.
----------------
पं. दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 26 – पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला 25 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी
पुष्प अर्पण केले.
याप्रसंगी जिल्हा पुनर्वसन अधिकारी एस.ए
खांदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, अधिक्षक एन.डी
कुळकर्णी, नायब तहसीलदार के.व्ही पाटील, एन.व्ही येलकर, एस.जी गिरी, श्री मोगल
आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment