news 26.8.2016


एसटीची पुणे चंद्रपूर वातानुकूलित बस सेवा सुरू
      बुलडाणा दि. 26 राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे (शिवाजीनगर) ते चंद्रपूर वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. ही बस अहमदनगर, औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशिम, कारंजा, यवतमाळ, वणी मार्गे चंद्रपूरला जाणार आहे. ही फेरी संपूर्णपणे वातानुकूलीत (स्कॅनीया) असून जिल्ह्यातील मेहकर येथील प्रवाशांसाठी उपयुक्त आहे.
  बस पुणे येथून सायंकाळी 7 वाजता सुटणार असून अहमदनगर 8.50 वाजता, औरंगाबाद 10.45 वाजता, जालना रात्री 12. 10, मेहकर रात्री 1.35, वाशिम 3.20, कारंजा 4.35, यवतमाळ 5.55, वणी सकाळी 8 आणि चंद्रपूर सकाळी 9.15 वाजता पोहोचेल. ही बस चंद्रपूर येथून सायंकाळी 7 वाजता पुण्यासाठी सुटणार असून मेहकर येथे रात्री 2 वाजून 10 मिनीटांनी पोहोचणार आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.  
****************
शासकीय तंत्र माध्यमिक शाळेत तासिका तत्त्वावर अर्ज आमंत्रित
      बुलडाणा दि. 26 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, बुलडाणा या संस्थेत तासिका तत्वावर सत्र 2016-17 करिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इंग्रजी, मराठी व जनरल फाऊंडेशन या विषयांसाठी तासिका तत्वावरील एक पदाकरिता शिक्षक हवे आहेत. मराठीसाठी एम.ए, बी.एड द्वितीय श्रेणी, इंग्रजीसाठी एम.ए, बी.एड द्वितीय श्रेणी आणि जनरल फाऊंडेशनसाठी एम. कॉम, बी.एड द्वितीय श्रेणी, एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील पात्रता असलेल्या उमेदवारांनी 6 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, मलकापूर रोड, बुलडाणा येथे मुळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी, असे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.

*****

Comments