Saturday, 21 September 2019

2019 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचारसंहीतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
-जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे
  • विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
  • 27 सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना
  • जिल्ह्यात 2251 मतदान केंद्र,व 12 सहाय्यक मतदान केंद्र
  • 9 हजार 957 कर्मचाऱ्यांची आवश्यकता,216 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
बुलडाणा, दि‍. 21 : भारत निवडणूक आयोगाने दि 21 सप्टेंबर 2019 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील 07  विधानसभा मतदारसंघाकरीता 21ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रिया 27 ऑक्टोबर  2019 रोजी पूर्ण होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहीता जिल्ह्यात लागू झाली आहे. या आचारसंहीतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिली.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात विधानसभा निवडणूक 2019 विषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत,आदी उपस्थित होते.
            जिल्हयात एकूण सात विधानसभा मतदारसंघ असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात एकूण 2251 व 12 सहाय्यक मतदान केंद्र अशी एकुण 2263 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 7 महिला मतदान केंद्र, 7 आदर्श मतदान केंद्र व 1 अपंग मतदान केंद्र आहे. 21-मलकापूर विधानसभा मतदार संघासाठी 300 मतदान केंद्र, पुरूष मतदार 1 लक्ष 40 हजार 963, महिला मतदार 1 लाख 26 हजार 703 अशी एकुण 2 लक्ष 67 हजार 666 मतदार,22-बुलडाणा विधानसभा मतदार संघासाठी 330 मतदान केंद्र, सहाय्यक मतदान केंद्र 05, पुरुष मतदार 1 लक्ष 58 हजार 780 ,महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 169 ,तृतीयपंथी मतदार 02, अशी 3 लक्ष 4 हजार 951 मतदार, 23- चिखली मतदार संघासाठी 312 मतदान केंद्र , 01 सहाय्यक मतदान केंद्र, पुरुष मतदार 1 लक्ष 52  हजार 311, महिला मतदार 1 लक्ष 41 हजार 761, तृतीय पंथी मतदार 01,अशी एकुण 2 लक्ष 94 हजार 73, 24- सिंदखेड राजा मतदार संघासाठी 332 मतदान केंद्र ,04 सहाय्यक मतदान केंद्र ,पुरुष मतदार 1 लक्ष 63 हजार ,104,महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 162, अशी एकुण 3 लक्ष 11 हजार 266, 25 –मेहकर  मतदार संघासाठी 348 मतदान केंद्र ,पुरुष मतदार 1 लक्ष 52 हजार 910, महिला मतदार 1 लक्ष 39 हजार 760 अशी एकुण 2 लक्ष 92 हजार 670,26- खामगाव मतदार संघासाठी 316 मतदान केंद्र,पुरुष मतदार 1 लक्ष 48 हजार 14,महिला मतदार 1 लक्ष 31हजार 711, 03 तृतीयपंथी मतदार,अशी एकुण2 लक्ष 79 हजार 728,27- जळगाव जामोद मतदार संघासाठी 313 मतदान केंद्र, 02 सहाय्यक मतदान केंद्र, पुरुष मतदार 1 लक्ष 52 हजार 325, महिला मतदार 1 लक्ष 36 हजार 753,03 तृतीयपंथी मतदार,अशी एकुण 2 लक्ष 89 हजार 81,  अशी एकुण 2251 मतदान केंद्र व 12 सहाय्यक मतदान केंद्रावर 10 लक्ष 68 हजार 407,पुरुष मतदार, 9 लक्ष 71 हजार 19महिला मतदार, व 09 तृतीयपंथी मतदार अशाप्रकारे एकूण 20 लक्ष 39 हजार 435 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
मतदारांच्या सुविधेसाठी 1950 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर  मतदार निवडणूक विषयी माहिती प्राप्त करू शकतो. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचार संहीता उल्लंघन व तत्सम तक्रारी असल्यास सामान्य नागरिक केवळ एक फोटो अथवा व्हिडीओ काढून C-VIGIL या ॲप्सवर टाकून निदर्शनास आणू शकतो. त्यानंतर भरारी पथक सदर तक्रारीची स्थळावर जावून शहानिशा करून तक्रारींवर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी नमूद केले.
            जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्याला 4 हजार 288 बॅलट युनीट, 3129 कंट्रोल युनीट व 3388 व्हिव्हिपट मशीन  प्राप्त झाले आहे. या प्राप्त मशीनची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीत पात्र कुणाचेही नाव सुटू नये यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम दोन टप्प्यामध्ये राबविण्यात आली. 31 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर या वेळेस अपंग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. अपंग मतदारांना सुविधा होण्यासाठी व्हिल चेअरची व्यवस्था रॅम्प्, वाहतुक सुविधा तसेच गर्भवती स्त्र‍ि‍या व वयोवृध्द मतदारांकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी स्वयंसेवक नियुक्ती करण्यात येतील.
            मतदारांना निवडणूक विषयक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी, मतदार यादीतील नावाची खात्री करण्यासाठी आयोगाने 1950 हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा उपयोग मतदार करू शकतात. तसेच उमेदवारांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी ‘सुविधा’ ॲप्स विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 07 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व 3 मतदान अधिकारी याप्रमाणे 04 कर्मचारी यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.त्याकरीता 9052 कर्मचारी व राखीव 905  सह एकूण 9 हजार 957 कर्मचाऱ्यांची निवडणूकीसाठी आवश्यकता आहे. निवडणूक कामकाजासाठी 10 ते 12 मतदान केंद्राकरीता 1 क्षेत्रीय अधिकारी याप्रमाणे 216 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहितीही  जिल्हाधिकारी यांनी  यावेळी दिली.
            जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावे यादृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज आहे.अवैध दारू, अवैध शस्त्रास्र याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
           
असा आहे निवडणूक कार्यक्रम
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना 27 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असुन  असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 04 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी  05 ऑक्टोबर  रोजी होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 07 ऑक्टोबर 2019 आहे. मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी 24 ऑक्टोबर  2019 रोजी तर निवडणूक प्रक्रिया 27 ऑक्टोंबर 2019 रोजी पूर्ण होणार आहे.
                                                                        ******


No comments:

Post a Comment