राखीव प्रवर्गामधून निवडून आलेल्या
उमेदवारांनी त्रुटींची पुर्तता करावी
- जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाचे आवाहन
- अनुसूचित जाती 1950, विजाभज 1961, इमाव व विमाप्र 1967 पूर्वीचा पुरावा असावा
बुलडाणा, दि.21 : जिल्ह्यात
ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. या
निवडणूकांमध्ये आरक्षीत जागांवर राखीव प्रवर्गामधील उमेदवार निवडून आले. अशा
उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाकडे
सादर केली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये कागदपत्रांया त्रुटींची पुर्तता केलेली
नसल्याने जात वैधता प्रमाणपत्र अशा उमेदवारांना निर्गमित करणे गैरसोयीचे झाले आहे.
तरी जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे
प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडतळणीचे विनियमन) अधिनियम 2000 आणि जाती पडताळणी
नियमावली 2012 चे कलम 17 नुसार विहीत मुदतीत त्रुटींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या जातीचे दाव्यानुसार म्हणजेच अनुसूचित जातीकरीता सन 1950
पूर्वीचे, विमुक्त जाती, भटक्या जमातीकरीता सन 1961 पूर्वीचे, इतर मागासप्रवर्ग व
विशेष मागास प्रवर्गाकरीता सन 1967 पूर्वीचे कागदपत्रे समितीस सादर करणे गरजेचे
आहे. तसेच अर्जदारांनी प्रस्तावास जोडलेल्या वंशावळ सिद्ध करणारे कागदोपत्री शालेय
व महसूली पुरावे समितीस सादर करावीत.
अर्जदारांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र देणे
अनिवार्य आहे. तरी निवडून आलेल्या राखीव जागांवरील उमदेवारांनी समितीस संपर्क
साधून त्रुटीनुसार कागदपत्रांची पुर्तता करावी. निवडून आलेल्या उमेदवारांना जात
वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास ते या पदाकरीता अपात्र ठरणार आहेत. तरी
कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र
पडतळणी समिती यांनी केले आहे.
********
जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा
बुलडाणा, दि.21 : जिल्हा
सामान्य रूग्णालयात 20 मार्च 2018 रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत
आहे. या दिनाला शासनाने ‘आ म्हणा.. विचार मुखाचा’.. विचार आरोग्याचा हे घोषवाक्य ठेवण्यात
आले होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत भुसारी, श्रीमती पिसे, संगिता
वाघ, श्रीमती खेडकर, श्रीमती मेहेत्रे, श्रीमती शेळके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक दंत शल्य चिकित्सक डॉ. शैलेश वैष्णव
यांनी केले. मौखिक आरोग्याविषयी माहिती डॉ. आशिष गायकवाड यांनी दिली. संचलन सिद्धार्थ
जाधव यांनी केले. यावेळी डॉ. नम्रता सिगल यांनी मौखिक आरोग्य राखण्याबाबत प्रात्याक्षिक
दाखविले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दंत आरोग्य तज्ज्ञ सुनील राजस, दंत यात्रिकी
चेतन महाजन, कार्यक्रम सहायक रामेश्वर बांबल, दंत सहायक मलीक खान, सामाजिक
कार्यकर्ता शारदा गाडेकर, भारत कोळे, नरेंद्र सनांसे, इंदू मोरे, करूणा घोडेस्वर
यांनी प्रयत्न केले.
*****
पाणी
टंचाई निवारणार्थ नळ योजनांची
विशेष दुरूस्ती मंजूर
- जिल्ह्यातील सात
गावांचा समावेश
बुलडाणा, दि.21 - पाणीटंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील भालगांव,
अंचरवाडी या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. तर
पांढरदेव गावासाठी तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील निपाणा, दे.राजा
तालुक्यातील नारायणखेड, बोराखेडी बावरा गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर
करण्यात आली आहे. तर सिनगांव जहागीर गावासाठी तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर
करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक
न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची
रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू
होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी
पुरवठा, जिल्हा परिषद यांनी करावा. सदर
मंजूर कामे इतर निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री
केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल,
असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे
******
देऊळगांव राजा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा, दि. 21 : जिल्हा कौशल्य रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दे.राजा यांच्या
संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
करुन देण्यासाठी 23 मार्च 2018 रोजी औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, दे.राजा येथे सकाळी 11.00 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे.
या मेळाव्यातंर्गत धूत ट्रान्समिशन लि.
औरंगाबाद येथील कंपनीकरीता ट्रेनी ऑपरेटरची 150 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक
पात्रता मुलाखत निवड पध्दतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. वयोमर्यादा 18 ते 27
वर्ष, वेतन 7200-9000 रूपये असणार आहे. सतिषजी इन्फ्राटेक ॲण्ड मिडीया प्रा. लि. चिखली कंपनीकरीता वेल्डर,
हेल्पर, फिटर, इलेक्ट्रीशियन, सुरक्षा रक्षक 35 पदे, उमेदवार इयत्ता 10 वी व आयटीआय
उत्तीर्ण असावे, मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार असुन 6000 ते 10000 रूपये वेतन,
18 ते 36 वर्ष वयोमर्यादा असावी. गर्दे ऑटोकॉन प्रा. लि. अकोला येथील कंपनीसाठी ब्रांच
मॅनेजर, सर्व्हीस इंजिनीयर, ॲटो इलेक्ट्रिशीयन केवळ पुरूष उमेदवारांना या पदांच्या
अनुक्रमे 1, 10 आणि 2 पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच याच कंपनीकरीता बॅक ऑफिस एक्सुकेटीव्ह केवळ महिला
उमेदवारांकरीता 2 पदे भरावचयाची आहेत. त्यासाठी पदवीधर उमेदवार असावा. या सर्व पदांसाठी कमीत कमी 1 ते 3 वर्षाचा अनुभव
आवश्यक आहे. नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.
अधिक माहिती साठी सहाय्यक संचालक ,जिल्हा
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 07262-242342 व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
दे.राजा यांच्या 07261-232605 या क्रमांकावर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी सेवायोजन
कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 5 पासपोर्ट फोटो
व बायोडाटा सोबत आणावा, असे आवाहन सहाय्यक संचालक ,जिल्हा रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेतसथळाला भेट देवून Employment टॅबवर
क्लिक करावी. Job seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी / आधार कार्ड क्र व पासवर्ड
sign in करावी. त्यानंतर होम पेजवरील job fair
पर्याय निवडावा. त्यानंतर बुलडाणा जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यासाठी
उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करावी. तसेच I agree या बटनावर क्लिक करावी.
पात्रतेनुसार पदाची निवड करून applay बटनावर क्लिक करावे. उमेदवारांनी मेळाव्यात
उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्याशिवाय निवड चाचणीत सहभागी
होता येणार नाही.
No comments:
Post a Comment